सत्यशोधक न्युज
चंद्रपूर
उपजिल्हा प्रतिनिधी:-हंसराज चव्हाण
मो.न:-9881554661
मुख्य संपादक:- राजु एन शंभरकर
मो.न:-9511673435

जिल्ह्यातील भद्रावती तालुक्याच्या हद्दीत API विरेंद्र केदारे सह पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदार कडून माहीती मिळाली की, मौजा कोंडेगाव परीसरात अवैधरित्या कोंबड्याचा झुंजीवर पैशाची हार-जित ची बाजी लावून जुगार खेळत आहे.
दरम्यान पोलिस निरीक्षक भद्रावतीत यांना सदर घटनेची माहीती देत घटनास्थळावर गुप्तबातमीदारचा माहीत वरून छापा टाकून पाच कोंबडे किंमत २ हजार रूपये, अंगझडती २ हजार ६६० रुपये, असा नगदि ४ हजार ६६० रूपये असा मुद्देमाल जप्त करुन सहा आरोपींविरुद्ध भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात पोलिसांना यश आले.
सदर कारवाई पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांचा मार्गदर्शनात API विरेंद्र केदारे यांचा नेतृत्वात स.पो.महेंद्र बेसरकर, पो.शी. जितेंद्र पराते, संतोश कावळे, भारत पुसांडे, शंकर घुगे यांनी केली.


