Tuesday, June 23, 2026
HomeUncategorizedनायलॉन मांजा विक्री करणारे 34 इसम तडीपार

नायलॉन मांजा विक्री करणारे 34 इसम तडीपार

सत्यशोधक न्युज

मुख्य संपादक:- राजु एन शंभरकर

  प्लास्टीकस व इतर कृत्रिम वस्तुपासुन बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याच्या सणाच्या वेळी करतात. त्यामुळे पक्ष्यांना व मानवी जिवीतास तिव्र ईजा होनार असा असतांनी सुध्दा पतंग उठविण्यासाठी जाणार्या  धाग्यांवर शासनाने बंदी घातलेली आहे. चंद्रपूर चे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस रिना जनबंधू , यांचे मार्गदर्शनाखाली पर्यायी पर्यावरण पुरक धाग्याचा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात अधिसुचना निर्ममित करून तसेच अधिसूचनेत प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यप्रणाली नुसार चंद्रपूर शहरातील पोलिस स्टेशन स्तरावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले असतांनी सदर नायलॉन मांजावर प्रतिबंध घालण्यासाठी विशेष पथक तयार करून गुप्त माहितीनुसार छापे घालुण त्यांचेवर कायदेशिर कारवाई करून अशा धाग्यांवर बंदी घालण्यात आली.
   यावेळी  १३ जानेवारीत २०२५ रोजी अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांनी पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील १९ इसम, पोलीस स्टेशन रामनगर येथील ०८ इसम, पोलीस स्टेशन घुग्घुस येथील ०२ इसम, पोलीस स्टेशन दुर्गापुर येथील ०४ व पोलीस स्टेशन मुल येथील ०१ इसम अशा एकुण ३४ इसमांना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ (२) अन्वये दिनांक १३ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ पर्यंत ०३ दिवसा करीता चंद्रपूर जिल्हयातुन तडिपार करण्यात आलेले असल्याची माहीता प्रसार माध्यमातून चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी दिली आहे.
  आगामी सण उत्सव अनुषंगाने मोठया प्रमाणावर जिल्हयात नायलॉन मांजा विकी करणाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याने कारवाईची मोहीम राबवून जिवितहानी प्लास्टिकसदृष नायलॉन मांजा वर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात आली.
 दरम्यान सर्वात मोठी पहीलीच कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर  रिना जनबंधू  यांचे मार्गदर्शनात महेश कोंडावार  पोलीस निरीक्षक, स्थागुशा चंद्रपूर तसेच पोलीस निरीक्षक पोलिस स्टेशन चंद्रपूर शहर प्रभावती एकुरके,पोलीस निरीक्षक  पोलिस स्टेशन रामनगर, आसिफराजा शेख, पोलीस निरीक्षक पोलिस स्टेशन घुग्घुस श्याम सोनटक्के, पोलीस निरीक्षक पोलिस स्टेशन दुर्गापुर, लता वाडीवे व पोलीस निरीक्षक पोलिस स्टेशन मुल सुमित परतेकी यांनी मोलाची कामगिरी बजावुन सराईत इसमांना चंद्रपूर शहरातील तडीपार करण्यात आलेले असल्याची सुध्दा माहीती प्रसार माध्यमातून एक  प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular