मुख्य संपादक
मो. न- 9511673435
दुचाकी चोरटा पोलिसांनी पकडला
मोठी कारवाई
अधिक विश्वासात घेतले तेव्हा,
कबूली दिली; चोरीची उघड झाली !
जिल्ह्य़ातील गावा पासून तर गल्ली बोळ्यातून चंद्रपूरातून तर शहर तालुक्यातील काही दिवसांपासून वाढत्या दुचाकी चोरट्यांनी थैमान घातले असता या दुचाकी चोरट्यांना आळा घालण्यात सुरूवात करावी, होणार्या चोरीचा घटनांचा उघडकीस आणावेत या बाबतीत पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू ,उपविभागीय पोलिस अधीकारी सुधाकर यादव यांनी रामनगर पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी आसिफ राजा शेख यांचा सह गुन्हे शोध पथकातील मार्गदर्शन करुन सुचना केल्या असता आसिफ रजा शेख यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी, अंमलदार यांना दुचाकी वाहन चोरटे यांची गोपनीय माहीत सांगता करुन तात्काळ गुन्हाची शोध मोहीम राबविण्यात आदेशीत केले.
यानुसार रामनगर शोध पथकासह अंमलदार, अधिकारी सुद्धा रामनगर पोलिस स्टेशन येथील अपराध क्र. ११९८/ २०२४ कलम ३०३ (२) B.N.S. मधील चोरीचा तपासाला कसोशीने सुरुवात केली असतांना गुप्तबातमीदारांनी सदर चोरीचा घटनेची गुप्त माहिती दिली.
दिलेल्या माहीती चा आधारावर गुन्हातील आरोपीचा मागावर राहुन त्याचा ठाव ठिकाणांवर शोधाशोध केल्यानंतर आरोपी वारंवार आपले राहण्यास असणारे ठिकाणाहून पळून जात असे. आरोपी ला शिताफीने सापळा रचुन शेवटी २१ जानेवारी ला ताब्यात घेतले असता, त्याला विचारपूस केली सुरुवातीला त्याने उडवा-उडवीचे उत्तर दिल्याने विश्वासात घेऊन विचारले असतांना केलेल्या गुन्हाची आरोपीने कथन केले की, रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत, चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन हद्दीत केलेला गुन्ह्याची कबूली जबाब देऊन ४ लाख ८ हजार किंमतीचा ९ मोटर सायकल जप्त करून विविध भागातील दुचाकी चोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
सदरील कारवाई ही पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांचा मार्गदर्शनात सुचना देत रामनगर पोलिस स्टेशन रामनगर निरीक्षक आसिफ राजा शेख, API देवाजी नरोटे, API हनुमान उगले, आनंद खरात सचिन गुरुनुले, लालू यादव, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, शरद कुडे, मनिषा मोरे, अमोल गिरडकर, रविकुमार ढेंगळे, संदिप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पुलवार, ब्लुटि साखरे यांनी केली.


