Wednesday, June 24, 2026
HomeUncategorizedसत्यशोधक न्युज

सत्यशोधक न्युज

मुख्य संपादक

राजु एन शंभरकर

मो.न – 95 11673435

 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी प्रा.महेश पाणसे यांची नियुक्ती...

      महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष प़ा.महेश पानसे यांच्या संघटन कौशल्याची दखल   घेत पत्रकार संघाचे संस्थापक राज्य संघटक संजय भोकरे यांचे शिफारशीनुसार 

त्यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सुचनेला विशेष महत्व देत राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी प्रा.महेश पाणसे यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.
प्रा.महेश पाणसे यांनी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांच्याकडे विदर्भ विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी राज्याध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली होती.
प्रा.महेश पाणसे यांच्याकडे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी असताना सर्वप्रथम चिमूर
येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा अधिवेशन घेण्यात आले होते.
प्रा.महेश पाणसे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्कालीन चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप रामटेके,चिमूर तालुका अध्यक्ष केवलसिंग जुनी,आणि तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रमाने तथा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने,”जिल्हा अधिवेशन,यशस्वी केले होते.
तदनंतर प्रा.महेश पाणसे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे,”विदर्भ स्तरिय अधिवेशन,अधिवेशन घेण्यात आले होते.ब्रम्हपूरीचे अधिवेशन सुध्दा तालुका पदाधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमाने यशस्वी ठरले होते.
तद्वतच प्रा.महेश पाणसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात गोरगरीब जनतेला व रुग्णांना जिवनावश्यक मदत पुर्व विदर्भात करण्यात आली होती.याचबरोबर विद्यार्थ्यांच्या व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आले होते.समाजहितोपयोगी उपक्रम राबविण्यात आले होते.

उपराजधानी नागपूर येथे सुध्दा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अधिवेशन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घेण्यात आले होते.
पुर्व विदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची यशस्वी बांधणी करून प्रभावी व परिणामकारक शक्ती प्रा.महेश पाणसे यांनी उभी केली हे त्यांचे उल्लेखनीय कर्तव्य ठरले आहे.

   प्रा.महेश पाणसे यांनी पत्रकार संघाचे वाढीसाठी आणि ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे,अशाप्रकारची अपेक्षा राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केली आहे. येत्या ३ फेब्रुवारी २०२५ ला चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे नवनियुक्त राज्य उपाध्यक्ष महेश पानसे यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष शंकर बोरघरे याचे

पुढाकाराने संघटनेचा भव्य रजत महोत्सव संपन्न होत आहे.

      प्रा.महेश पाणसे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी झालेली नियुक्ती,पत्रकार संघातंर्गत त्यांच्या अथक परिश्रमाचा व महत्त्वपूर्ण कार्याचा सन्मान असून

संघटनेचे मोठे पदाधिकारी व पत्रकार यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular