Tuesday, June 23, 2026
HomeUncategorizedड्राय डे ला LCB ची कारवाई!

ड्राय डे ला LCB ची कारवाई!

स्विफ्ट डिझायर देशी दारूचा पेटी जप्त

सत्यशोधक न्युज

मुख्य संपादक- राजु एन शंभरकर

मो.न.- 9511673435

ड्राय डे च्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी वरोरा हद्दीतील गस्त घालत असतांना मुखबिराकडून गोपनीय माहीत मिळाली की, पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर वाहनामधील देशी दारू वाहतुक करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार वरोरा कडून नागपुर कडे जाणार्‍या रोडवरील खालसा धाबा खांबाडा समोर नाकाबंदी केली असता दिलेल्या माहीती वरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायरला थांबवता थोड्याफार समोर जाऊन रोडच्या कडेला लावून चालकाने गाडी सोडून पळ काढला.
या प्रसंगी स्विफ्ट डिझायर वाहनाला ताब्यात घेत पाहणी केली तर त्यात देशी दारूचा २८ पेट्या मिळून आल्या त्या जप्ती करून तपासात घेत ३ लाख स्विफ्ट डिझायर कार ची किंमत ९८ हजार रुपयांपर्यंत किमतीच्या देशी दारुचा पेटी असा ३ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून पोलिस स्टेशन वरोरा येथील अपराध क्र.४७/ २०२५ कलम ६५ अ (अ) ८३ म.दा.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीत प्राप्त झाली.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांचा मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचा नेतृत्वात PSI मधुकर सामलवार, स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, नितीन कुरेकार, दिपक डोंगरे, दिनेश अराडे, प्रशांत नागोसे, शशांक बदामवार, गोपिनाथ नरोटे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular