Tuesday, June 23, 2026
HomeUncategorizedसत्यशोधक न्युज

सत्यशोधक न्युज

मुख्य संपादक- राजु एन शंभरकर

मो.न- 9511673435

देवा- देवीच्या बकऱ्यावर;
बिपट्यानी मारला डल्ला

जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती संख्या, त्याचे मानवी वस्तीवरील हल्ले हा चिंतेचा विषय ठरू पाहत आहे. आता ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. अधिवास सोडून भरदिवसा बिबट्या गाव, शहरांच्या वेशीवर पोहचला असून मानव-बिबट यांच्यातील संघर्ष वाढला आहे. जिल्ह्यात हजारो हल्ले बिबट्यांनी केले आहेत. यात नागरिकांसह पशूधनाची हानी झालेली आहे.
 गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने बिबट्यांचा भद्रावतीत तांडा वस्तीमध्ये वावर आढळून येता आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. मानव-बिबट यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी ठोस धोरण आखण्याची सबंधित प्रशासनाला लक्ष द्यायची गरज आहे.
 असाच प्रकार तांडा येथील गरीब शेतकरी युवक सोनु धारवत यानी घरील देवा-देवीचा कार्यक्रमा करीता दोन बोकड एक बकरी विकत घेतल्या असतांनी पहाटे अंदाजे ४ वाजता घरात शिरून त्या धनावर बिबट्यानी डल्ला मारून फडश्या पाडल्या असल्याची घटना तांडा गावातील समोर येत आहेत. प्राथमिक अंदाजे ६५ ते ७० हजार रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचे सोनु धारवत शेतकर्‍याकडून माहीनुसार लक्षात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहेत.
    सदरील घटनेची माहीती शेतकर्‍यानी वनविभाग दिली असता घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केला बिबट्याची दहशत परीसरात पसरली असून झालेल्या नुकसान भरपाई वनविभागाने सबंधित प्रशासनाकडून  देण्यात यावी तसेच सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी सोनु धारवत कडून होत, असल्याची पण माहीती प्राप्त झाली.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular