Monday, June 22, 2026
HomeUncategorizedरोजगार मेळावे – कौशल्य व संधी यांचा सेतू - आ. किशोर जोरगेवार

रोजगार मेळावे – कौशल्य व संधी यांचा सेतू – आ. किशोर जोरगेवार

*चंद्रपूरमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन.
मुख्य संपादक : राजू एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न.9511673435

आजचा पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून तरुणाईच्या भविष्याला दिशा देणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. तरुणांच्या मनात असलेली ऊर्जा आणि उद्योजकतेची वृत्ती योग्य दिशेने वळवली, तर आपण आपल्या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लावू शकतो. कौशल्य विकास हाच भविष्यातील यशाचा मंत्र असून रोजगार मेळावे हे कौशल्य आणि संधीचा सेतू आहेत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर, मॉडल करिअर सेंटर, चंद्रपूर आणि जनशिक्षण संस्थान-२, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुरातील जनशिक्षण संस्था येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी संजय पवार, जनशिक्षण संस्थानचे संचालक अमोल गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतूराज सुर्या, बँक ऑफ महाराष्ट्रचे एल.डी.एम. राजू नंदनवार, कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचे अध्यक्ष भाऊराव झाडे, सुभाष ढोंबरे, प्रशिक्षण केंद्राचे सहायक आयुक्त भैयाजी येरणे, रोषण गभाले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार पुढे म्हणाले की, आजचा हा मेळावा आपल्या तरुण पिढीसाठी आशेचा किरण आहे. रोजगार मिळवण्याइतकेच रोजगार निर्माण करणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे तरुणांनी कौशल्य प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करावा. शासनाच्या विविध योजना आणि मार्गदर्शन केंद्रांचा लाभ घ्यावा. आज येथ�

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular