Monday, June 22, 2026
HomeUncategorizedमित्र परिवारच्या वतीने पडोली येथे अम्मा की पाणपोई

मित्र परिवारच्या वतीने पडोली येथे अम्मा की पाणपोई

कार्यकारी संपादक : हंसराज एल रामटेके
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र

स्व. गंगुबाई (अम्मा) जोरगेवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवारच्या वतीने पडोली येथे नागरिकांसाठी अम्मा की पाणपोई या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या पाणपोईचे उद्घाटन पडोली येथील प्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ. कश्यप यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच प्रवीण सिंग, सामाजिक कार्यकर्ते दयानंद नागरकर, नकुल वासमवार, गणेश पाचभाई, सावन महल्ले, शुभम बोन्द्रे, गणेश महल्ले, शुभम सोनवणे आदी उपस्थित होते.

      गावातील नागरिकांसाठी उन्हाळ्यातील तापदायक परिस्थितीत शुद्ध आणि थंड पाण्याची सोय होणे ही गरजेचे आहे.  अम्मा की पाणपोईमुळे  आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अम्मा यांच्या सेवाभावी कार्याची आठवण करून देणारा हा उपक्रम असून भविष्यातही असेच उपक्रम राबविणार असल्याचे यावेळी मित्र परिवारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular