कार्यकारी संपादक : हंसराज एल रामटेके
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
चंद्रपूर:- भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ व्या जयंती निमित्त सत्यशोधक न्युज ऑनलाईन पोर्टल चे मुख्य संपादक राजु शंभरकर यांनी हार, फूले, मेणबत्ती ऐवजी शालेय साहित्य वाटप केले.
याप्रसंगी सर्वप्रथम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर कोषाध्यक्ष प्रविण बतकी, दैनिक लोकशाही वृत्तपत्राचे जिल्हा प्रतीनीधी शंकर बोरघरे, डाॅ. पंकज कावळे, पत्रकार रमाकांत यादव यांनी दिप पुजन व माल्यार्पण केले.
“शिक्षण हे वाघीणेचे दुध” आहे, “आणि जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चालना मिळावी या हेतूने बुक, परीक्षा खर्डा, कंम्पोस बाॅक्स, रजिस्टर, पेन आदि संकलित करून समाजात उपयोगी अभियान राबविले.
संकलीत केलेले साहित्य सत्यशोधक न्युज पोर्टल परिवार तर्फे आणि श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर चे कोशाध्यक्ष तथा दैनिक महासागर चे जिल्हा प्रतीनीधी प्रविण बतकी यांचा मुख्य उपस्थित दैनिक लोकशाही जिल्हा प्रतिनिधी शंकर बोरघरे, डाॅ. पंकज कावळे, रिड पब्लिक न्युज २४ भारत चे मुख्य संपादक रमाकांत यादव पत्रकार व समाजसेवकांचा वतीने गरजु शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप केले.
यावेळी समाजसेवक देवा कुंटा, माजी नगरसेवक शाम कनकम, समाजसेवक कलाकार मल्लारप, राजेंद्र तराळे, हंसराज रामटेके, हंसराज चव्हाण, फारूक शेख, प्रदीप बिश्वास, नामदेव डोंगरे, शंकर मुत्त्येलवार, परीसरात नागरीक सत्यशोधक न्युज मित्र परिवार आदींची उपस्थिती होती.


