Monday, June 22, 2026
HomeUncategorizedचंद्रपुरात शिवसेनेचा वर्धापन दिन वृद्ध आश्रमातील वृद्धाच्या हस्ते केक कापून अल्पोहार व...

चंद्रपुरात शिवसेनेचा वर्धापन दिन वृद्ध आश्रमातील वृद्धाच्या हस्ते केक कापून अल्पोहार व फळ वाटप करून उत्साहात साजरा.

संपादक : राजेंद्र आर तराले
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो .न.9404862389

चंद्रपूर :- शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील देवाडा येथील डेबू सावली वृद्ध आश्रमातील वृद्ध आजी, आजोबांच्या हस्ते केक कापुन व अल्पोहार आणि फळ वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांच्या नेतृत्वात तर चंद्रपुर महिला आघाडी जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बल्लारपुर विधानसभा महिला आघाडी प्रमुख क्रिष्णाताई सुरमवार, चंद्रपुर तालुका संघटक संजय शिंदे, चंद्रपुर उप-महानगर प्रमुख सूचक दखने, चंद्रपुर उप-महानगर प्रमुख विश्वासजी खैरे, चंद्रपुर उप-तालुका प्रमुख विक्की महाजन, मा. नगरसेवक नानाभाऊ दुर्गे, निखिल सुरमवार, विवेक दुर्गे आदींची उपस्थिती होती.

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून वृद्धांना आपुलकीने आधार देण्याचे काम शिवसेना मुख्यनेते तथा उप-मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब सदैव करत येत असून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची साथ आपल्याला नियमित राहिल, अशी ग्वाही देत सामाजिक जाणीव आणि समाजात सकारात्मक संदेश शिवसेनेच्या वतीने देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular