Monday, June 22, 2026
HomeUncategorized**IMA, महाराष्ट्र राज्य

**IMA, महाराष्ट्र राज्य

मुख्य संपादक :राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो .न.9511673435

दिनांक: 10 जुलै 2025

संपाबाबत तातडीचा निर्णय

आज दिनांक 10 जुलै 2025 रोजी रात्री मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याशी वर्षा बंगल्यावर तातडीची आणि सकारात्मक बैठक झाली. ही बैठक मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सहकार्याने आणि डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या पुढाकाराने घडून आली.

या बैठकीस IMA महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम, सचिव डॉ. अनिल आव्हाड, डॉ. शिवकुमार उत्तुरे व डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते.

मा. मुख्यमंत्री महोदयांनी आमचे निवेदन गांभीर्याने ऐकून घेतले व तत्काळ मुख्य सचिव श्री. धीरजकुमार तसेच MMC प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांच्याशी संपर्क साधत उद्या सकाळी यावर तातडीची बैठक घेण्याचे आदेश दिले.

या सकारात्मक दृष्टीकोनाची दखल घेत, IMA महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची तातडीची बैठक घेऊन सर्वानुमते 11 जुलै 2025 रोजीचा आरोग्य सेवा बंद आंदोलन (संप) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔸 हे आंदोलन मागे नाही घेतलेले असून, फक्त पुढे ढकलण्यात आले आहे.
🔸 सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार योग्य कृती झाली नाही तर पुढील आंदोलनाची घोषणा केली जाईल.

सर्व IMA सदस्यांनी दाखवलेल्या एकतेबद्दल, संयमाबद्दल आणि पाठबळाबद्दल मन:पूर्वक आभार!

डॉ. संतोष कदम
अध्यक्ष
डॉ अनिल आव्हाड
सचिव
IMA, महाराष्ट्र राज्य

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular