Wednesday, October 29, 2025
HomeUncategorizedआदिवासी समाज म्हणजे सात्विकता, पराक्रम आणि परिश्रमाचे प्रतीक - आ. सुधीर मुनगंटीवार

आदिवासी समाज म्हणजे सात्विकता, पराक्रम आणि परिश्रमाचे प्रतीक – आ. सुधीर मुनगंटीवार

आदिवासी समाजाच्या विकास, हक्क आणि सशक्तीकरणासाठी सदैव कटिबद्ध

*पोंभूर्णा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजीत सोहळा

कार्यकारी संपादक : हंसराज एल रामटेके
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो .न.7868988999

चंद्रपूर – आदिवासी समाज हा केवळ आपल्या सात्विक जीवनशैलीसाठीच नव्हे, तर पराक्रम आणि अथक परिश्रमासाठीही ओळखला जातो. निसर्गाशी एकरूप होऊन जगणारा, परंपरा, संस्कार आणि निष्ठा जपणारा हा समाज देशाच्या विकास प्रवासात मोलाचा वाटा उचलतो. देशाच्या राष्ट्रपती मा. द्रौपदीजी मुर्मू यांच्या नेतृत्वातून आदिवासी भगिनींना आणि समाजाला मिळालेला आत्मविश्वास हा अभिमानाचा विषय आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जागतिक आदिवासी दिवसानिमित्त पोंभूर्णा येथे आयोजित कार्यक्रमात केले.

जागतिक आदिवासी दिवसानिमित्त पोंभूर्णा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे जिल्हाप्रमुख जगन येलके, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम,सचिव हरी कोडापे, महिला अध्यक्षा उषाताई आलाम, महादेव मडावी, कवडू मडावी, कांता मडावी, गीताताई कुळमेथे, गीताताई कोवे, भीमराव मरसकोल्हे, सामाजिक कार्यकर्ता गणेश परचाके तसेच समाजाच्या महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आमदार श्री. मुनगंटीवार यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधत आपला आनंद व्यक्त केला. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी एवरेस्ट शिखर सर केले, ही शक्ती त्यांच्या अंगी जन्मजात आहे. योग्य संधी मिळाल्यास हेच विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात जागतिक पातळीवर झेंडा फडकवू शकतात. आदिवासी समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे त्यांच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हीच खरी प्रगती असेल, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

कष्टकरी व पराक्रमी आदिवासी समाजाच्या कल्याण, विकास आणि हक्कांच्या रक्षणासाठी सदैव खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमात आदिवासी भगिनींनी आमदार श्री. मुनगंटीवार यांना राखी बांधून आपुलकीचा मान व्यक्त केला आणि रक्षाबंधनाचा पवित्र सोहळा उत्साहात साजरा झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular