कार्यकारी संपादक हंसराज एल रामटेके
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न.7868988999.
चंद्रपूर, दि.
वन विभागातील कार्यरत व पात्र वनपाल यांना २५ जुन २०२५ रोजी झालेल्या बैठकीनुसार तातडीने वनक्षेत्रापाल पदावर पदोन्नती देण्याची कार्यवाही 9 महिन्यांपासून झालीच नाही. दरम्यान ताटकळत असलेल्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप होत असल्याने आता थेट प्रधान मुख्य संरक्षक कार्यालयापुढे धरणे देण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. सात दिवसांचा इशारा देत 12 सप्टेंबर ला हे आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे.
कॅस्ट्राईब वनविभाग कर्मचारी संगठने चे जिल्हाध्यक्ष नामदेव बनसोड यांनी सांगितले की, मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या १०० दिवसाच्या विशेष कृती महत्वाकांक्षी कार्यक्रमातंर्गत पदोन्नती हा एक विषय त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता.
पदोन्नती करिता आवश्यक असलेल्या प्रक्रियेनुसार वनपाल आणि वनक्षेत्रपाल पदोन्नतीची प्रतिक्षा यादी दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजीच प्रकाशित करण्यात आली होती. त्याप्रमाणे पदोन्नतीसाठी इतर आवश्यक बाबीची पुर्तता करण्यात येवुन दिनांक २५ जुन, २०२५ रोजी विभागिय पदोन्नती समीतीची सभा पार पडली असुन पदोन्नती करिता पात्र असलेल्या कर्मचा-यांची निवड प्रक्रिया सुध्दा करण्यात आलेली आहे.
मात्र पदोन्नती प्रक्रिया जानेवारी २०२५ पासुन आजमितीस ८ महिने लोटुनही वन विभागाकडुन पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत.
पात्र असूनही लाभाविनाच निवृत्त
वन विभागाच्या दिरंगाईने अनेकांना पदोन्नतीचा लाभ न घेताच निवृत्त होण्याची वेळ आली आहे. जे कर्मचारी खरोखर पदोन्नतीसाठी पात्र होते पंरतु सेवानिवृत्त झाले त्यांना त्यांच्या सेवानिवृत्ती पूर्वी पदोन्नती देणे आवश्यक होते नव्हे तर त्या कर्मचा-यांचा तो संविधानिक अधिकार होता. परंतु कोणतेही कारण नसतांना पदोन्नतीचे आदेश रोखुन ठेवणे ही बाब अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
मग त्यांचे काय होणार?
पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यास झालेल्या विलंबामुळे निवृत्ती स्वीकारावी लागली. त्यामुळे पदोन्नतीचे आदेश निर्गमित होतील त्या ‘दिनांकापासुन त्यांना सुध्दा पदोन्नतीचा मानीव दिनांक देवुन पदोन्नती पदाची वेतनश्रेणी लागु करण्यात यावी अशी संघटनेची मागणी आहे.


