*नवीन अंदाजपत्रक वरिष्ठाकडे सादर करुन भव्य व सुशोभनिय प्रवेशद्वार उभारण्याची सरपंच सौ. येरगुडे, ग्रा. वि. अधिकारी वेस्कडे ग्वाही
कार्यकारी संपादक हंसराज एल रामटेके
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो .न.7868988999
चंद्रपुर :- महाराष्ट्रातील ग्राम पंचायती मधील सर्वाधिक उत्पन्न असलेली ग्रा. पं. उर्जानगर येथील महात्मा ज्योतिबा फुले मार्ग कोंडी वार्ड क्र. ५ येथे साध्या पद्धतीचे स्वागत प्रवेशद्वार उभारण्याचे काम उर्जानगर ग्राम पंचायत करीत असल्यामुळे सदर प्रवेशद्वार काम तात्काळ बंद करुन भव्य व सुशोभनिय स्वागत प्रवेशद्वार उभारण्याची मागणी शिवसेना भारतीय कामगार संघटना जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी सरपंच, ग्रा. वि. अधिकारी व सदस्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
उर्जानगर ग्राम पंचायत परिक्षेत्रातील वार्ड क्र.१,५,६ येथे स्वागत प्रवेशद्वार उभारण्यात येत असून वार्ड क्र. १ व ६ मध्ये उभारलेले प्रवेशद्वार हे गावातील प्रवेशद्वार दिसत नसून एखादया घर मालकाचे गेट असल्याचे दिसत असल्याने तसेच महात्मा ज्योतिबा फुले मार्ग उर्जानगर (कोंडी) समोर ताडोबा राष्ट्रीय अभयारण्य मार्ग, पोलिस स्टेशन दुर्गापूर, जि. प. उ. प्राथ. शाळा, नेशनल गर्ल्स हायस्कूल आणि ग्रा.पं. उर्जानगरचे कार्यालय असल्यामुळे तसेच कित्येक वर्षीपूर्वी लगतच असलेली ग्रा. पं. दुर्गापुरने संत चंदुबाबा प्रवेशद्वार भव्य व सुशोभित केलेले नजरेसमोरे असताना देखील ग्रा.पं. उर्जानगर साधे प्रवेशद्वार बनवित आहे. त्यामुळे सदर बाबींकडे जातीने लक्ष देवून तात्काळ भव्य व सुशोभनिय स्वागत प्रवेश द्वार उभारण्यात येण्यासंदर्भात ग्रा.पं. उर्जानगरच्या सरपंच सौ. मंजूषाताई येरगुडे, ग्राम विकास अधिकारी युवराजजी वेस्कडे, ग्रा. पं. सदस्य मदन चिवंडे, ग्रा. पं. सदस्य अनुकूल खन्नाडे, ग्रा. पं. सदस्य लोकेश कोटरंगे यांच्या सोबत चर्चा केली. चर्चेअंती सदर काम बंद करून नवीन अंदाजपत्रक वरिष्ठाकडे सादर करण्यात येवून मंजूर अंदाजपत्रकानुसार भव्य व सुशोभनिय प्रवेशद्वार उभारण्याची ग्वाही उर्जानगर ग्रा. पं. सरपंच सौ. येरगुडे, ग्रा. वि. अधिकारी वेस्कडे व सदस्यांनी दिली.


