Tuesday, October 28, 2025
HomeUncategorized*इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे ऍलोपॅथिक डॉक्टरांचा रुग्णसेवा बंद ठेवण्याचा संप शंभर टक्के...

*इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे ऍलोपॅथिक डॉक्टरांचा रुग्णसेवा बंद ठेवण्याचा संप शंभर टक्के यशस्वी

मुख्य संपादक राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न.9511673435

चंद्रपूर

महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथिक डॉक्टरांना CCMP (Certificate Course in Modern Pharmacology) पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याबाबत काढलेल्या 05/09/2025 च्या परिपत्रकाच्या विरोधात आज गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल व दवाखाने तसेच शासकीय आरोग्यसेवा 24 तास बंद ठेवण्यात आली.

हा बंद 100% यशस्वी ठरला असून इंडियन मेडिकल असोसिएशन – चंद्रपूर शाखा तसेच महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) तर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे मुख्य मुद्दे :

  1. शैक्षणिक असमानता – MBBS हा 5.5 वर्षांचा सखोल अभ्यासक्रम असून CCMP हा केवळ 1 वर्षाचा कोर्स आहे.
  2. रुग्ण सुरक्षिततेवर गंभीर धोका – अपुरे प्रशिक्षणामुळे चुकीचे निदान व उपचार होऊ शकतात.
  3. दुहेरी प्रणालीचा गोंधळ – MMC ही फक्त MBBS डॉक्टरांसाठी असताना CCMP डॉक्टरांना परवानगी दिल्यास गोंधळ वाढेल.
  4. कायदेशीर मुद्दा – राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार आधुनिक औषधोपचार केवळ MBBS डॉक्टरांसाठीच परवान्याने मर्यादित आहेत.
  5. आंतरराष्ट्रीय दर्जावर परिणाम – महाराष्ट्रातील आरोग्यसेवेची विश्वासार्हता कमी होण्याची शक्यता.
  6. भविष्यातील दुष्परिणाम – या निर्णयामुळे इतर पद्धतीच्या डॉक्टरांकडून अशा मागण्या वाढण्याचा धोका.

CCMP डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक वैद्यकीय परवाना केवळ MBBS डॉक्टरांनाच द्यावा.

दिनांक 05/09/2025 चे शासन परिपत्रक त्वरित मागे घेण्यात यावे.

इंडियन मेडिकल असोसिएशन – चंद्रपूर व MARD चंद्रपूर यांनी रुग्णांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत, शासनाने या संदर्भात तातडीने योग्य निर्णय घेण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

✍️ डॉ. मंगेश गुलवाडे
उपाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य (2013-14)

✍️ डॉ. संजय घाटे
उपाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य (2025-26)

✍️ डॉ. रितेश दीक्षित – अध्यक्ष
✍️ डॉ. सुश्रुत भुकते – सचिव
✍️ डॉ. राहुल सैनानी – खजिनदार
इंडियन मेडिकल असोसिएशन, चंद्रपूर

✍️ डॉ. फुरहान अहमद – अध्यक्ष
✍️ डॉ. नम्रता यादव – उपाध्यक्ष
✍️ डॉ. देवाशिष घुगे – उपाध्यक्ष
✍️ डॉ. संजय रिनायत – सचिव
✍️ डॉ. अश्विनी तुंबडे – सचिव
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular