Saturday, June 20, 2026
HomeUncategorizedदस्त नोंदणीसाठी ४ हजारांची लाच; दुय्यम निबंधक व ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

दस्त नोंदणीसाठी ४ हजारांची लाच; दुय्यम निबंधक व ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात

भद्रावतीतील मालमत्ता नोंदणीसाठी पैशांची मागणी; एसीबीच्या कारवाईने नोंदणी विभागात खळबळ

मुख्य संपादक -राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्युज महाराष्ट्र
मो.न.9511673435

भद्रावती तालुक्यातील मालमत्तेच्या दस्त नोंदणीसाठी चार हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधक श्रेणी-१ अधिकाऱ्यासह त्याच्या डेटा ऑपरेटरविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई केली आहे. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना सापळा रचून दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे नोंदणी विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मुद्रांक व नोंदणी विभाग, चंद्रपूर कार्यालयातील दुय्यम निबंधक श्रेणी-१ मोहन चंद्रकांत शेट्टीवार यांनी तक्रारदाराच्या पक्षकारांच्या भद्रावती येथील मालमत्तेच्या दस्त नोंदणीचे काम करून देण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे दोन दस्तांसाठी एकूण ४ हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित रक्कम त्यांनी त्यांच्या डेटा ऑपरेटरमार्फत स्वीकारण्याचे ठरविले होते.
दरम्यान तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून आरोपीच्या सांगण्यावरून ऑपरेटरमार्फत स्वीकारली जाणारी ४ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आणि दोघांनाही ताब्यात घेतले.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधितांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.
याशिवाय शासकीय कामासाठी अवैध पैशांची मागणी करणाऱ्यांविरोधात एस�

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular