Saturday, September 26, 2026
HomeUncategorizedपोंभूर्णा कृषी कार्यालयात मनुष्यबळाचा तुटवडा; शेतकऱ्यांची कामे खोळंबली .

पोंभूर्णा कृषी कार्यालयात मनुष्यबळाचा तुटवडा; शेतकऱ्यांची कामे खोळंबली .

सत्यशोधक न्यूज.
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35.

पोंभूर्णा, प्रतीनीधी

पोंभूर्णा तालुका कृषी कार्यालयात आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांची विविध शासकीय कामे रखडली असून, कामानिमित्त कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडल्याने कार्यालयीन कामकाजाचा वेग मंदावला आहे.
पीकविमा, ई-पीक नोंदणी, पीक पाहणी, कृषी अवजारे अनुदान, बियाणे व खत योजनांचे प्रस्ताव, विविध अनुदान प्रकरणे तसेच इतर कृषी योजनांशी संबंधित कामे वेळेत पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एकाच कर्मचाऱ्याकडे अनेक जबाबदाऱ्या असल्याने नागरिकांना वेळेवर सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत.
सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन व सेवा मिळणे अपेक्षित आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक शेतकऱ्यांना विलंबाचा सामना करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
पोंभूर्णा कृषी कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरून आवश्यक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण होतील आणि कार्यालयीन सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतील, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular