Friday, September 25, 2026
HomeUncategorizedराज्यस्तरीय पत्रकार संमेलन अकोल्यात उत्साहात संपन्न; पत्रकारांच्या संरक्षणासाठी कठोर कायद्याची मागणी

राज्यस्तरीय पत्रकार संमेलन अकोल्यात उत्साहात संपन्न; पत्रकारांच्या संरक्षणासाठी कठोर कायद्याची मागणी

अकोला, दि. १९ जुलै : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन २०२६ अकोला येथील हॉटेल कृष्णा इम्पेरियल येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदेश सरचिटणीस डॉ .विश्वासराव आरोटे होते. मंचावर अतिथी म्हणून माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक महेश पानसे, प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी, विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे , विदर्भ संपर्कप्रमुख अनुप भार्गव, विभागीय अध्यक्ष सुनील फुलारी, महिला पत्रकार सौ .सो भारती सोमानी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे, संचालक सेवकराम तातोड, अकोला जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे, अखिल भारतीय भोई समाज विदर्भ अध्यक्ष श्रीमती अलका पचारे,मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन, हार अर्पण करून दिपप्रज्वन करण्यात आले.
सर्वप्रथम अधिवेशनात पत्रकारितेवरील होत असलेले हल्ले व शिस्त भंगाची कारवाई यावर चर्चासत्र पार पडले. चर्चासत्रामध्ये प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, उपाध्यक्ष महेश पानसे, सामाजिक प्रवक्ते नीरज शिरसाट, विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे, ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे, ज्येष्ठ संपादक मधुकरराव बावणे, विजय चव्हाण,विभागीय अध्यक्ष सुनील फुलारी यांनी सहभाग घेतला, सर्व मान्यवर्तीतींचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. परिसंवाद सत्राचे संचालन प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी केले.पत्रकारांवरील वाढते हल्ले, खोटे गुन्हे दाखल करणे, धमक्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे आघात आणि पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न यावर सखोल चर्चा करण्यात आली. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर व तातडीने कारवाई व्हावी, पत्रकार संरक्षणासाठी प्रभावी कायदा लागू करण्यात यावा तसेच शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. परिसंवादामध्ये
प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांनी मार्गदर्शनात सांगितले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता अधिक सक्षम, निर्भय आणि निष्पक्ष राहणे ही काळाची गरज आहे. वर्तमानपत्रे किंवा माध्यमे कोणत्याही राजकीय, आर्थिक अथवा सामाजिक दबावाखाली काम करता कामा नयेत. पत्रकारांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला किंवा लालसेला बळी न पडता सत्य, वस्तुनिष्ठ आणि जनहिताची भूमिका कायम ठेवावी, असे आवाहन केले आपण ज्या संघटनेमध्ये आहोत त्या संघटनेशी एकनिष्ठ राहा असे सांगत ज्यांचा कुंकू कपाळाला लावला त्यांचा प्रपंच नीट सांभाळावा अशी अपेक्षा आरोटे यांनी व्यक्त केली.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी यांनी आपल्या विचारातून पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. शासन आणि प्रशासनातील त्रुटींसह समाजातील सकारात्मक घडामोडी लोकांसमोर आणण्याचे कार्य पत्रकार करत असतात. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शासनाने स्वीकारून त्यांना न्याय मिळेल अशी यंत्रणा उभी करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. पत्रकारांनी ही या क्षेत्रामध्ये सत्याची कास सोडू नये असे आवाहन करून पित्त पत्रकारितेपासून दूर राहावे असे सांगितले. पत्रकारांनी हेवेदावे विसरून एकत्रपणे कार्य करावे संघटन मध्ये मोठे बळ असते असेही त्यांनी आपल्या विचारातून सांगितले. पत्रकारांचा समाजामध्ये विश्वास वाढवण्यासाठी सामाजिक कार्याला पत्रकारांनी बळ द्यावे असे निलेश सोमानी यांनी स्पष्ट केले.अन्य मान्यवरांनीही आपल्या विचारातून सखोल मार्गदर्शन केले.अधिवेशनात विविध विषयांवरील चर्चासत्रे, मार्गदर्शन सत्रे आणि पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये जीवन गौरव पुरस्कार मनोज पोलादे, दीपस्तंभ पुरस्कार शौकतअली मीर सर , शेतकरी कृषी पुरस्कार धनंजय साबळे, विवेकवादी पत्रकारिता पुरस्कार देविदास चव्हाण, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार गोपाळकृष्ण गुजराती, महाराष्ट्र गौरव पुरस्कार संघटनेचे डॉ. विश्वासराव आरोटे तर विदर्भभूषण पुरस्कार प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी व सौ भारती सोमानी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आकर्षक सन्मानचिन्ह, व भेटवस्तू कीट देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सोबतच राज्यस्तरीय प्रेरणादायी पुरस्कार उमेश अलोने, युद्ध वार्ता पुरस्कार जयेश जग्गळ, जिजाऊ पत्रकारिता पुरस्कार हर्षदा सोनोने , आरोग्य पत्रकारिता योगेश फरफट तिसरा डोळा पत्रकारिता अमोल नांदूरकर, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सर्वश्री सतीश देशमुख, गजानन गवई, औरंगजेब हुसेन, दीपक गवई, इरफान अहमद शेख, व आदर्श पत्रकारिता पुरस्कार उमेश ठाकरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .या सन्मान सोहळ्यामुळे पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. सदर अधिवेशनामध्ये प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांच्या हक्कासाठी तेरा ठराव मांडले त्याला सर्वानुमते मंजुरात मिळाली. प्रामुख्याने कोरोना काळापासून पत्रकारांना रेल्वे पास बंद झाल्याने ती सुरू करणे, एसटी महामंडळाच्या वातानुकूलित गाड्यांमध्ये पत्रकारांना मोफत प्रवासाचा लाभ मिळणे, लाडका पत्रकार शासनाने योजना सुरू करणे, ग्रामीण पत्रकारांना अधिक विकृती प्रदान करणे, शासनमान्य यादीत नसलेल्या वृत्तपत्रांना महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य दिन दिवाळी व प्रजासत्ताक दिन जाहिराती पूर्वीप्रमाणे सुरू करणे, ज्येष्ठ पत्रकार यांचा पत्रकार सन्मान निधीतील अटी शितल करणे, लघु वृत्तपत्रांना मुद्रण आणि कागदाच्या जीएसटी बिलातून सूट देणे, आधी स्वीकृती बाबत लागणाऱ्या ज्याच्याकाटीचा पुनर्विचार करून पत्रकारांना न्याय देणे, पत्रकारांसाठी घरकुल योजना सुरू करणे, आरटीआय शिक्षणाच्या कायद्यातून संपादक पत्रकार यांच्या पाल्यासाठी विशेष आरक्षण व सवलती देणे, पत्रकार कल्याणकारी मंडळ व वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाचे कार्य संचालन तातडीने सुरू करणे समवेत अन्य मागणीचा समावेश आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राज्यातून आलेल्या सर्व जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार व तालुका अध्यक्ष यांचा सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन विश्वासराव आरोटे व निलेश सोमानी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. अकोला येथे राज्यस्तरीय यशस्वी आयोजन केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे समवेत संपूर्ण टीमचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे , संचालन पातुर तालुकाध्यक्ष देवानंद गहिले, वैभव स्वामी तर पुरस्कार वितरण समारंभाचे संचालन प्रा. महेश पानसे यांनी केले
कार्यक्रमास राज्यातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पत्रकार, संपादक, विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular