सत्यशोधक, न्यूज
संपादक
राजेंद्र आर तराळे
भटाडी प्रतिनिधी
सत्यशोधक न्यूजचे मुख्य संपादक राजू एन. शंभरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज, दि. २० जुलै २०२६ रोजी भटाडी येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते विकास अलोणे यांनी सदिच्छा भेट देत त्यांचा भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन सत्कार केला.
यावेळी भारतीय संविधानातील समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा समाजात अधिकाधिक प्रसार व्हावा तसेच पत्रकारितेने लोकशाहीच्या मूल्यांचे जतन करत जनहितासाठी कार्य करावे, असा संदेश देण्यात आला.
संविधान भेट हा केवळ वाढदिवसानिमित्ताचा सन्मान नसून संविधानाबद्दल जनजागृती करण्याचा आणि लोकशाही मूल्यांप्रती आदर व्यक्त करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मुख्य संपादक राजू एन. शंभरकर यांनी विकास अलोणे यांचे मनःपूर्वक आभार मानत, संविधानाच्या मूल्यांशी निष्ठा ठेवून निर्भीड, निष्पक्ष आणि जनहिताची पत्रकारिता करण्याचा आपला संकल्प व्यक्त केला.



