सत्यशोधक न्यूज
✍️ मुख्य संपादक :- राजु एन. शंभरकर
📞 95116 73435
कोरपना, प्रतिनिधी
समाज संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय समता परिषद, चंद्रपूरच्या वतीने कोरपना येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. वैशाली संतोष कोटरंगे यांची कोरपना तालुकाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती अखिल भारतीय समता परिषद, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष श्री. जगदीशजी जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सौ. अनिता दत्तू बोढे यांच्या हस्ते सौ. वैशाली संतोष कोटरंगे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात सामाजिक ऐक्य, महिला सक्षमीकरण, संघटन विस्तार आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नवनियुक्त तालुकाध्यक्षा सौ. वैशाली संतोष कोटरंगे यांनी संघटनेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. जगदीशजी जुनघरे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. अनिता दत्तू बोढे, महासचिव सौ. सुशीलाताई दिलीप मत्ते, भद्रावती तालुकाध्यक्षा सौ. संगीताताई प्रदीप टोंगे तसेच नवनियुक्त कोरपना तालुकाध्यक्षा सौ. वैशाली संतोष कोटरंगे यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सौ. वैशाली संतोष कोटरंगे यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.



