आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाभावी उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
सत्यशोधक न्यूज
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित 'देवाभाऊ सेवा सप्ताह' अंतर्गत चंद्रपूर शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम उत्साहात पार पडले. वडगाव प्रभाग क्रमांक ८ येथील भाजपा महिला आघाडीच्या नेत्या सोनल देवतळे यांच्या नेतृत्वात भर पावसात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर संजय गांधी मार्केट परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमाला नागरिक, युवक-युवती, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपत सेवाभावाचे दर्शन घडविले.
यावेळी माजी खासदार हंसराज अहिर, भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कासमबोट्टुवार, भाजप नेते प्रकाश देवतळे, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, महामंत्री मनोज पाल, ग्रामीण महामंत्री नामदेव डाहुले, युवा नेते रघुवीर अहिर, मनपा गटनेते शेखर शेट्टी तसेच मीना माथनकर, साधना भोंगले, पुष्पा मातले, स्मिता मानकर, सौ. वैद्य, सौ. होकम, सौ. रेखा खंगार, सौ. बेबी मानकर, सौ. सोनपिपरे, सौ. चिंतावार यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, भाजप पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हे सर्वोच्च समाजसेवेचे कार्य असल्याचे सांगत नियमित रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच भर पावसात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित भविष्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'देवाभाऊ सेवा सप्ताह' अंतर्गत सोनल देवतळे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेले वृक्षारोपण आणि भव्य रक्तदान शिबिर हे चंद्रपुरातील विशेष आकर्षण ठरले. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि मानवसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.



