Saturday, August 8, 2026
HomeUncategorizedबल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई ३ लाख २८ हजारांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त; एक...

बल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई ३ लाख २८ हजारांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त; एक आरोपी ताब्यात

सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35

बल्लारपूर,

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीविरोधात बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई करत ३ लाख २८ हजार ७० रुपयांचा देशी व विदेशी दारूसाठा जप्त केला. 
या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी बल्लारपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, राजेंद्र प्रसाद वॉर्ड येथील मक्का मस्जिद ते नाग मंदिर मार्गावरून जांभळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक केली जात आहे. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसह नाग मंदिर परिसरात सापळा रचून नाकाबंदी केली.
दरम्यान नाकाबंदीदरम्यान टाटा इंडिगो मांझा (क्रमांक MH-34 AA-6906) हे वाहन संशयास्पदरीत्या येताना दिसताच पोलिसांनी ते थांबवून पंचांसमक्ष झडती घेतली. वाहनाची तपासणी करताना विविध बॉक्समध्ये लपवून ठेवलेला मोठा दारूसाठा आढळून आला.
 तपासादरम्यान वाहनातून 'रॉकेट संत्रा' कंपनीची ९० एम.एल.ची देशी दारू, तसेच 'Sahyandri Gold Premium Whisky' या ब्रँडच्या १८० एम.एल.च्या काचेच्या बाटल्या आणि 'Mumbai Malt Whisky' या ब्रँडच्या ९० एम.एल.च्या प्लास्टिक पाऊचमधील विदेशी दारू जप्त करण्यात आली.
 याशिवाय पोलिसांनी वाहनासह ३ लाख २८ हजार ०७० रूपयेञकिमतीचा मुद्देमाल जप्त केला. 
या प्रकरणी ख्वाजा शेख उर्फ बडे मोहम्मद शेख (वय ५२, रा. साईबाबा वॉर्ड, भेंडे नाला, बल्लारपूर) याच्याविरुद्ध पो.स्टे. अप.क्र. ८२१/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे  उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार (राजुरा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, महेश कुकुडकर, फुलचंद लोधी, शांतकुमार घोसे, लखन चव्हाण यांनी केली.
 तसेच बल्लारपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर पोलिसांची करडी नजर कायम असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून गेला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular