Monday, September 28, 2026
HomeUncategorizedकोरपना येथे २९ सप्टेंबरला ‘आपले वृद्धाश्रम’ भूमिपूजन सोहळा

कोरपना येथे २९ सप्टेंबरला ‘आपले वृद्धाश्रम’ भूमिपूजन सोहळा

आई साहेब बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उपक्रम; स्नेहभोजनासह प्रबोधनात्मक व गीत गायनाचा कार्यक्रम

सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजू एन शंभरकर
95 11 67 34 35

कोरपना, प्रतीनीधी

आई साहेब बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘आपले वृद्धाश्रम’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भूमिपूजन सोहळा मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. कोरपना ते वणी रोड, तांबाळी फाटा, तुकडोजी नगर, कोरपना जि. चंद्रपूर येथे हा सोहळा होणार आहे.
या उपक्रमाचा भूमिपूजन सोहळा दुपारी ४ वाजता होणार असून, त्यानंतर दुपारी ५ वाजता आगमनापर्यंत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ८ वाजल्यापासून प्रबोधनात्मक व गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना आधार, सुरक्षित निवारा आणि आपुलकीचे वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘आपले वृद्धाश्रम’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या भूमिपूजन सोहळ्यास नागरिकांनी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:- प्रियाताई खाडे, अध्यक्ष, आई साहेब बहुउद्देशीय सामाजिक संस्था ८८३०७३५१९१.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular