Wednesday, September 30, 2026
HomeUncategorizedउर्जानगरात पोषणाचा जागर; अंगणवाडीतून बालआरोग्याचा संदेश

उर्जानगरात पोषणाचा जागर; अंगणवाडीतून बालआरोग्याचा संदेश

कोंडीतील तीन अंगणवाडी केंद्रांचा सहभाग; ग्रामसेवक युवराज वेस्कडे व संतोष पारखी यांची उपस्थिती

उर्जानगर ,
सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35

‘पोषण माह २०२६’ अंतर्गत उर्जानगर ग्रामपंचायत परिसरातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषणविषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. बालकांना सकस आहार, योग्य पोषण आणि निरोगी आरोग्याचे महत्त्व याबाबत पालक व नागरिकांना माहिती देण्यात आली.
या उपक्रमात कोंडी क्रमांक १ च्या अंगणवाडी सेविका सौ. इंदिरा वाकुडकर, क्रमांक २ च्या अंगणवाडी सेविका सौ. सुनीता आवळे आणि क्रमांक ३ च्या अंगणवाडी सेविका सौ. शोभा वाकुडकर यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला उर्जानगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक युवराज वेस्कडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष संतोष पारखी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बालकांच्या वाढीसाठी पोषक आहाराचे महत्त्व, कुपोषण टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि पालकांची भूमिका याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी सेविकांनी पोषणविषयक जनजागृती करत पालकांनी बालकांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.
“सुदृढ बालक, सक्षम समाज” या उद्देशाने पोषणविषयक जनजागृती उपक्रम सातत्याने राबविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular