Monday, June 22, 2026
HomeUncategorized*बाळुभाऊ यांच्या जाण्याने निर्भीड युवा नेतृत्व हरपल्याचे दुःख - आ. किशोर जोरगेवार

*बाळुभाऊ यांच्या जाण्याने निर्भीड युवा नेतृत्व हरपल्याचे दुःख – आ. किशोर जोरगेवार

संपादक : राजेंद्र आर तराले
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न.9404862389

आठवणीतले बाळुभाऊ… द्वितीय पुण्यस्मरण सोहळा हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी आहे. बाळु धानोरकर हे एक निस्वार्थ, प्रामाणिक आणि धडाडीचे नेते होते. त्यांच्या जाण्याने चंद्रपूर जिल्ह्याने एक सक्षम युवा नेतृत्व गमावले असल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
बाळुभाऊ धानोरकर मित्र परिवाराच्या वतीने वरोरा येथे “आठवणीतले बाळुभाऊ” द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे, विनोद दत्तात्रय यांची उपस्थिती होती.
शिवसेनेत सोबत काम करण्याची संधी लाभली. त्यांच्या जिद्दीने, काम करण्याच्या पद्धतीने नेहमीच ते कार्यकर्त्यांसाठी एक आदर्श नेता राहिले. त्यांचे स्पष्ट विचार, कुठल्याही गोष्टीत सडेतोड भूमिका घेण्याची त्यांची शैली कायमच प्रेरणादायी राहिली. त्यांच्या स्वप्नांचा सन्मान करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करायला हवे. त्यांनी कधीही कुठल्याही संकटापुढे हार मानली नाही. बाळु धानोरकर यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular