Wednesday, April 29, 2026
HomeUncategorizedप्रलंबित वनपालाची वनक्षेत्रपाल पदी लवकर होणार पदोन्नती.

प्रलंबित वनपालाची वनक्षेत्रपाल पदी लवकर होणार पदोन्नती.

सत्यशोधक न्यूज

मुख्य संपादक. राजु शंभरकर. मो.9511673435


दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी हरिसिंग सभागृह, नागपूर येथे गणेश नाईक वनमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना राज्यातील प्रतीक्षेत असलेल्या वनपालांची रखडलेली वनक्षेत्रपाल पदी पदोन्नती करण्याकरिता विभाग वाटप झालेल्या वनपालांनी एकत्र येऊन वनमंत्रीना निवेदन देऊन चर्चा केली असता सकारात्मक विचार करून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत पदोन्नती आदेश पारित करण्यात येईल असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
निवेदन देण्यासाठी प्रामुख्याने विलास कोसनकर समन्वयक, अरुण पेंदोरकर , रमेश घुटके, अनंत राखुंडे, दिनेश तेलंग, मनोज रामटेके, निशा देशमुख डी. टी . चौधरी, दिनेश नंदेश्वर, नामदेव केंद्रे, शेषराव नारनवरे, राममोहन पेदापल्लीवार , मेघराज निबुद्धे तसेच इतर वनपाल हजर होते.
राज्यभरात वनखेत्रपालांची २२६ पदे रिक्त असून वनसंरक्षण, वनसंवर्धन करणे आणि मानव – वन्यजीव संघर्ष वेळीच ताण कमी करण्यासाठी म्हणून वनपालांची प्रलंबित वनक्षेत्रपाल पदोन्नती आवश्यक असून निवड व विभाग वाटप झालेल्या १२९ वनपालांची वनक्षेत्रपाल पदी पदोन्नती आदेश लवकरच पारित करण्यात येतील असे आश्वासन वनमंत्री यांनी दिले.
तसेच ३७ – ३९ वर्षे वनसेवा करून दर महिन्यात वनपाल, वनक्षेत्रपाल पदी पदोन्नती न होता वनपाल पदावरच सेवानिवृत्त झालेत व होत आहेत ही विशेष बाब लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारचे अन्याय वनकर्मचारी – वनाधिकारी यांच्यावर होणार नाही तसेच विभागात व जनमानसात सन्मान असणार.
सर्व उपस्थित वनपालांनी गणेश नाईक वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे आभार
मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular