पुण्यातील मुसळधार पावसामुळे पुस्तक वितरण उपक्रम पुढे; आता १९ जुलै रोजी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके
सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक:- राजु एन शंभरकर
95 11 67 34 35
गडचिरोली, प्रतिनिधी
गडचिरोली..चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षेची पुस्तके वितरित करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
मात्र, पुणे येथे सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे पुस्तकांची वाहतूक नियोजित वेळेत होऊ न शकल्याने हा उपक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता हा मोफत पुस्तक वितरण उपक्रम रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता, सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे पार पडणार आहे.
दरम्यान स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसाठी पूर्वनोंदणी केलेले सर्व युवक-युवती, विद्यार्थी तसेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
याशिवाय ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दर्जेदार अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



