Sunday, August 9, 2026
HomeUncategorizedटॉवर टेकडीजवळ जंगलात जुगार अड्ड्यावर रामनगर पोलिसांचा छापा; ४० लाख ४ हजार...

टॉवर टेकडीजवळ जंगलात जुगार अड्ड्यावर रामनगर पोलिसांचा छापा; ४० लाख ४ हजार ७९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त

जुगार खेळणाऱ्या २० जणांवर कारवाई; काही जण अंधाराचा फायदा घेत पसार

चंद्रपूर, प्रतिनिधी

सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35

टॉवर टेकडी परिसरातील जंगलात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रामनगर पोलिसांनी धडक कारवाई करीत मोठा मुद्देमाल जप्त केला. दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या या कारवाईत जुगाराच्या साहित्यांसह तब्बल ४० लाख ४ हजार ७९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जंगलाच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

रामनगर पोलिस ठाण्याच्या प्रेस नोटनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, टॉवर टेकडी भागातील जंगल परिसरात काही लोक ५२ ताशांच्या पत्त्यांवर पैशांची बाजी लावून कट्टापत्त्याचा जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी रामनगर पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभाती एकुरके यांच्यासह पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले.

सदर जुगाराचे ठिकाण जंगलातील झाडाझुडपांच्या मध्यभागी असून टॉवर टेकडीकडे जाणाऱ्या एकमेव पायवाटेपासून तेथपर्यंत पोहोचता येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस पथकाने वेगळ्या मार्गाने जंगलात प्रवेश केला.

पोलिसांनी काटेरी झाडे व वेलींतून पुढे सरकत अचानक रात्रीच्या सुमारास छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून अनेकांना ताब्यात घेतले.

कारवाईत ताब्यात घेतलेले व्यक्ती

पोलिसांच्या प्रेस नोटनुसार ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये

१) इम्रान खान रशीद खान, वय ३३ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. बाबूपेठ फुले चौक, चंद्रपूर.

२)अनिल पंढरीनाथ ढोंगे, वय ३९ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. जुनोना चौक, शांतिनगर मदरसा मागे, चंद्रपूर.

३)सागर मुरली नागरे, वय ३२ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. रयतवारी कॉलरी तेलगु शाळेजवळ, चंद्रपूर.

४) मन्सूर असरार अहमद, वय ३२ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. रयतवारी कॉलरी माता मंदिराजवळ, चंद्रपूर.

५)अर्शद चांद शेख, वय ३३ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, रा. बाबूपेठ डी.एड. कॉलेजजवळ, चंद्रपूर.

६)अमोल निलकंठ तडस, वय ३८ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. जुनोना चौक, बाबूपेठ, चंद्रपूर.

७)सुरेश पुनराज वावरे, वय ५६ वर्षे, व्यवसाय ठेकेदारी, रा. बाबूपेठ मोटघरे लेआऊट, चंद्रपूर.

८)गुड्डू अंडेवाला, रा. बल्लारशाह, मोबाईल क्रमांक प्रेस नोटमध्ये नमूद.

९)हरी पुंजारी, रा. बल्लारशाह.

१०)अमीत मारखन गुप्ता, रा. महाकाली कॉलरी, चंद्रपूर.

११)जावेद शेख, रा. बल्लारशाह.

१२)भिमराव माडलीकर, रा. फुले चौक, बाबूपेठ, चंद्रपूर.

१३) सुरज उर्फ बुरा, रा. लालपेठ मायनस क्वार्टर, चंद्रपूर.

१४)वतन कांबळे, रा. आंबेडकर चौक, बाबूपेठ, चंद्रपूर.

१५) सादिक ईराणी, रा. चंद्रपूर.

१६)राहुल कोमटी, रा. जंगम वस्ती, लालपेठ, चंद्रपूर.

१७.)येलन्ना मामीडवार, रा. लालपेठ कॉलरी नं. ३, चंद्रपूर.

१८)राज बब्लर, रा. एरिया हॉस्पिटलजवळ, लालपेठ, चंद्रपूर.

१९)मुन्ना माधव मिश्रा, रा. लालपेठ, चंद्रपूर.

२०) धनराज सावकर, रा. अंचलेश्वर गेट, चंद्रपूर.

यांच्यासह अन्य दोन ते तीन व्यक्तींची नावे व पत्ते पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये नमूद नसल्याचे दिसून येते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून जुगाराच्या साहित्यांसह ४० लाख ४ हजार ७९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक प्रभाती एकुरके, सपोनि हनुमान उगले तसेच रामनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

जंगलाच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केल्याने जुगार चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular