Thursday, September 24, 2026
HomeUncategorizedचंद्रपूरच्या बेरोजगार युवकांसाठी NATS/NAPS अंतर्गत अँप्रेन्टिसशिपच्या संधी वाढवा - शिवसेना भारतीय कामगार...

चंद्रपूरच्या बेरोजगार युवकांसाठी NATS/NAPS अंतर्गत अँप्रेन्टिसशिपच्या संधी वाढवा – शिवसेना भारतीय कामगार संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

WCL मध्ये स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना संधी – शिवसेनेचा आरोप

संपादक :राजेंद्र आर. तराळे
सत्यशोधक न्यूज महाराष्ट्र.
मोबाईल 9404862389.

चंद्रपूर, दि. 22 सप्टेंबर जिल्हा हा औद्योगिक आणि खाण क्षेत्राचा जिल्हा असूनही येथील हजारो ITI, Diploma, Engineering आणि पदवीधर युवक बेरोजगार आहेत. तर दुसरीकडे WCL, MIDC आणि जिल्ह्यातील मोठे उद्योग बाहेरच्या राज्यातील कामगार भरती करतात, असा आरोप शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष केला आहे.

भारत सरकारच्या NATS (National Apprenticeship Training Scheme) आणि NAPS (National Apprenticeship Promotion Scheme) योजनेंतर्गत युवकांना प्रत्यक्ष उद्योगात प्रशिक्षण, कौशल्य आणि स्टायपेंड मिळतो. चंद्रपूर जिल्हा हा Board of Apprenticeship Training (Western Region), Mumbai च्या अखत्यारीत येतो.

2026 मध्ये WCL मध्ये विविध ट्रेडमध्ये Apprentice भरतीची प्रक्रिया सुरू आहे. याच संधीचा फायदा चंद्रपूरच्या स्थानिक भूमिपुत्रांना मिळावा, यासाठी शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष लिलाबाई दशरथ पारखी यांनी आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिले.

निवेदनातील प्रमुख मागण्या :

1) WCL च्या चंद्रपूर, बल्लारपूर, वणी, वणी उत्तर, माजरी एरियामध्ये स्थानिक युवकांसाठी Apprenticeship च्या जागा वाढवाव्यात.
2) MIDC मधील सर्व कंपन्यांची बैठक घेऊन NATS/NAPS च्या जागांचा आढावा घ्यावा.
3) ITI, Diploma, Engineering युवकांसाठी तालुकानिहाय मार्गदर्शन आणि नोंदणी शिबिरे घ्यावीत.
4) जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली WCL, जिल्हा उद्योग केंद्र, रोजगार विभाग आणि ITI संस्थांची संयुक्त बैठक घेऊन वार्षिक लक्ष्य निश्चित करावे.

“चंद्रपूरच्या जमिनीत कोळसा निघतो, प्रदूषण आम्ही सहन करतो आणि नोकऱ्या बाहेरचे लोक घेऊन जातात, हे चालणार नाही. WCL आणि MIDC ने आधी चंद्रपूरच्या भूमिपुत्रांना Apprenticeship ची संधी दिली पाहिजे. यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगार युवकांचा मोर्चा काढू,” असा इशारा संतोष पारखी यांनी दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती कौशल्य विकास आयुक्त नवी मुंबई, BOAT मुंबई, WCL महाव्यवस्थापक आणि जिल्हा उद्योग केंद्र यांना पाठविण्यात आल्या आहेत.

जय महाराष्ट्र!

आपलाचं

संतोष लिलाबाई दशरथ पारखी
*चंद्रपूर तालुका प्रमुख, शिवसेना
तथा जिल्हाध्यक्ष, शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपूर
मो. नं. 9766833818

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular