Wednesday, April 29, 2026
Homeचंद्रपूरआमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मायात्मज सुतार समाजाला शववाहिका हस्तांतरित

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मायात्मज सुतार समाजाला शववाहिका हस्तांतरित

मुख्य संपादक / राजु शंभरकर

चंद्रपूर: मायात्मज सुतार (झाडे) समाजाच्या बांधवांनी जनसेवेसाठी शववाहिकेची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने, आमदार निधीतून समाज बांधवांना शववाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज छोटेखानी कार्यक्रमात सदर शववाहिका मायात्मज सुतार समाजाला हस्तांतरित करण्यात आली.
या कार्यक्रमाला मायात्मज सुतार समाजाचे अध्यक्ष दत्ता उमरकर, सचिव अर्चना वांढरे, महेश शास्त्रकार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज शहर प्रमुख सविता दंढारे, राशिद हुसेन यांची उपस्थिती होती.
सुतार समाज हा सेवाभावी समाज असून या समाजाच्या वतीने अनेक सामाजिक कार्यात पुढाकार घेतला जातो. सामाजिक भान असलेला हा समाज आहे, आणि या समाजाने केलेली मागणी पूर्ण करता आली, याचे समाधान असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.
मृतदेह नेण्यासाठी अनेक वेळा अडचणी येत असतात. समाजातील गरजू लोकांसाठी मदत म्हणून ही मागणी करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने आमदार किशोर जोरगेवार यांनी स्थानिक आमदार निधीतून समाजाच्या सेवेसाठी शववाहिका उपलब्ध करून दिली आहे. आज यंग चांदा ब्रिगेड कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात, या शववाहिकेचे हस्तांतरण पार पडले. या प्रसंगी समाजातील अनेक बांधव उपस्थित होते.
“समाजाच्या सेवेसाठी आपल्याकडून काही ठोस योगदान देणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळेच मायात्मज सुतार समाजाने शववाहिकेची मागणी केली असता, ती पूर्ण केली. समाजातील प्रत्येक घटकाला आधार देणे हे आपल्या कार्याचा उद्देश आहे. आपल्या माध्यमातून ही सेवा होत आहे, याचा आनंद आहे. ही सेवा समाजासाठी उपयुक्त ठरेल, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular