Saturday, June 20, 2026
HomeUncategorizedमाढेळि गावात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; टिनाचे शेड उडाले

माढेळि गावात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; टिनाचे शेड उडाले

मुख्य संपादक -राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्युज
मो न 9511673435

 वरोरा तालुक्यातील माढेळी गावात आज सायंकाळच्या सुमारास अवघ्या पाच मिनिटे गारपीट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी टिनाचे शेड उडून गेल्याची घटना घडली.

प्रसंगी वादळाचा वेग इतका प्रचंड होता की काही घरांवरील पत्र्याचे शेड उखडून दूर फेकले गेले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र काही घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ नुकसानग्रस्त ठिकाणी धाव घेत शेड व इतर साहित्य सुरक्षित करण्याचे काम सुरू केले. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात ji येत आहे. स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular