.
परीक्षा केंद्रावर मोठा घोळ, हजारो विद्यार्थ्यांचा संताप, बैंक अध्यक्ष संचालक व परीक्षा घेणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मनसेची मागणी.
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीच्या परीक्षेत मोठा घोळ झाला असून परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनीचे पोर्टल चं हॅक करण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे, जर आपण A वर क्लीक केलं तर शेवटी ते B वर जाईल किंव्हा चुकीच्या ऑप्शन मध्ये जाईल अशी सेटिंग केली गेली असल्याने मनसेने या नोकर भरतीत कोट्यावधी रुपयांचा नोकर भरती घोटाळा असल्याची तक्रार केली होती त्याला बळ मिळतं आहे. दरम्यान चंद्रपूर नागपूर पुणे नाशिक औरंगाबाद जालना नांदेड गोंदिया भंडारा येथे परीक्षा केंद्र ठेवल्यानंतर आता जो परीक्षेत घोळ झाला असल्याने व ही परीक्षा दोन दिवसांनी होईल असे सांगण्यात आल्याने दोन दिवस बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा खर्च कोण देईल हा प्रश्न करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने परीक्ष घेणाऱ्या बैंक अध्यक्ष संचालक व परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी प्रशासनाकडे केली आहे, यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे व इतर पक्षाचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सत्यशोधक हंसराज चौहान उपजिल्हा प्रतिनिधी
मो. नं.


