सत्यशोधक न्यूज.
राजू. एन .शंभरकर मुख्य संपादक.मो.9511673435
वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपूर
दिनांक : २९/१२/२०२४
दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाचे स्वागत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याने सदर उत्सव साजरा करण्याकरीता अतिउत्साही तरूणमंडळी मद्य प्राशन करून दुचाकी/चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रॅश (Rash) ड्रायव्हिग, स्टंटबाजी सारखे कृत्य करताढ़. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभिर अपघात घडुन जिवितहानी होत असते. त्याच्या अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याचे दृष्टीने दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी पासुन ते दिनांक ३१/१२/२०२४ पर्यंत संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ठिक ठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे.
तरी सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, कोणीही मद्य प्राशन करून वाहन चालविणार नाही. जर मद्य प्राशन करून वाहन चालवितांना आढळुन आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी. जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपुर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्य प्राशन, ट्रिपल सिट व रॅश (Rash) ड्रायव्हिग / स्टंटबाजी करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात विशेष मोहीम घेवुन कडक कारवाई करण्यात येणार आहे. तरी नववर्षाचे स्वागत करतांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व अपघात होणार नाही याची सर्व नागरीकांनी दक्षता घ्यावी. याबाबत चंद्रपुर पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आवाहन केलेले आहे.
(प्रविणकुमार पाटील) पोलीस निरिक्षक वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर


