Tuesday, June 23, 2026
HomeUncategorizedवाळु तस्करांच्या आवळल्या मुसक्या वाळु तस्करांच्या आवळल्या मुसक्या अवैध वाळु चोरी करणारे...

वाळु तस्करांच्या आवळल्या मुसक्या वाळु तस्करांच्या आवळल्या मुसक्या अवैध वाळु चोरी करणारे दोन आरोपी फरार.

सत्यशोधक न्युज

मुख्य संपादक

राजु एन शंभरकर

मो.न- 9511673435

वाळु तस्करांच्या आवळल्या मुसक्या

अवैध वाळु चोरी करणारे दोन आरोपी फरार

भद्रावती पोलिसांची कार्यवाही.

  जिल्ह्यातील रेती घाटाचा लिलाव झाला नाही त्यामुळे काही का होईना या अवैध रेती चोरी प्रकणात जास्तीत जास्त सुशिक्षित तरून युवक या व्यवसायाचा विळख्यात येत असल्याचे बोलले जात आहे, कमी पैशात जास्त मुनापा कसा मिळवायचा म्हणून टोळके बनवुन गावातील गुंडाचा मदतीने रेती तस्कराचा बोलबाला होत असल्याचे दिसून येत आहेत. राजुरा, भद्रावती तालुक्यात काही घाटातून वन संपत्तीचे म्हणा किंवा शेताचे नुकसान करीत हे रेती तस्करी करीत आहे.
रेती तस्करीसाठी  वाहतुक मार्गे काढण्याकरिता गावगुंडानची मदत घेऊन रस्ता मोकळा करीत आहे.  स्थानिक भाईलोकांची किंना पोस्टर नेत्यांची पण गरज भासते म्हणून तस्करांची हिम्मत सुध्दा वाढली हे तस्कर आपल्या नेत्यांन सोबत प्रसिध्दी पोस्टर (बॅनर) झाडावर टांगून आपली ओळख दाखवतात. रेती व्यवसायाचा मैदानात जास्त जास्त सुशिक्षित बेरोजगार उतरले  असल्याचे पण कारवाई दरम्यान दिसतात. अवैध रेती वाहतूक करीत असतांना मात्र वाहकासह क्लिनर वर कारवाई केली जाते चोरा ला सोडून संन्याशाला सजा मिळताच असे नागरीकांत बोलले जाते.
 असे असतांना अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रणा करीता महसूल विभाग पोलिस विभाग सक्रिय झाला असतांना भद्रावती पोलिसांना मौजा जेना नाल्यातून अत्याधुनिक यंत्राचा म्हणजे J.C.B मदतीने ट्रॅक्टर, हायव्हामध्ये वाळूउपसा करीत करीत अल्याची गोपनीय माहीत मिळाली असता क्षणाचा विलंब न करीत माहीता चा आधारे पंचासह घटनास्थळावर छापा टाकून ७ ब्रास रेती ,२ ट्रॅक्टर, हायव्हा, जेसीबी असे काॅलम क्रमांक ०७ नुसार ६३ लाख ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून आरोपी प्रणय अनंता पेके (वय२९ रा.चारगाव खुर्द वरोरा) धंदा ड्राइवर, प्रतिक गजानन माहुरे  (वय२९), मोहम्मद फिरोज समेद्दिन सिध्दकि (वय२८ रा.माजरी काॅलरी क्र.२ भद्रावती) चालक, सुशांत मुकिंदा कुडमेथे (वय २४ रा. किलोनी त.भद्रावती) यांना अटक केली आरोपी मधील दोन आरोपी फरार असल्याचे पोलिस सूत्रानुसार माहीती प्राप्त झाली.
 ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांचा मार्गदर्शनात, पो. अ. वृषभ काटकर, अमोल काचोरे यांचा नेतृत्वात, विठ्ठल काटकर, चालक नांदेकर, उप.कार्या. वरोरासह, A.P.I. संजय मिश्रा, अनुप आष्टणकर, विश्वनाथ चुदरी, निकेश ढेंगे, विजय उपरे यांनी केली.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular