Tuesday, June 23, 2026
HomeUncategorizedस्थानिक गुन्हे शोध पथक चंद्रपूर यांची कारवाई घरफोडी प्रकरणी गुन्हेगाराला अटक.

स्थानिक गुन्हे शोध पथक चंद्रपूर यांची कारवाई घरफोडी प्रकरणी गुन्हेगाराला अटक.

सत्यशोधक न्युज

मुख्य संपादक- राजु एन शंभरकर

मो.न.- 9511673435

घरफोडी करून फरार आरोपी घुग्घुस पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद र.न.३६८/२०२४ कलम ३०५(अ)३३१(४) यांची चंद्रपूर स्थानिक गुन्हे शोध पथकांना गोपनीय माहीत मिळाल्यावरून रामनगर हद्दीत सापळा रचुन ईसम मोहम्मद सरफरोज शागीर शाहा (वय २४ रयतवारी काॅलरी आमटे ले आऊट चंद्रपूर ) यास ताब्यात घेत चोरीस गेलेल्या ऐवज सह साक्षीदारांन देखत विचारपूस केली असता, नमुद गुन्हा आणि पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत आणखी दोन घरफोड्या विधी संघर्षित बालाकांन सोबत घरफोडी केल्याची त्यानी कबुली जबाब पंचा समक्ष दिला असल्याची माहीती पोलिसांन कडून आज प्राप्त झाली.
 यावेळेस इतर गुन्हातील पण चोरीस गेलेल्या सोन्याचे, चांदिचे दागीने गुन्हात वापर करण्यात आलेल्या मोपेड दुचाकी संपूर्ण किंमत असा एकूण ३ लाख ६७ हजार ६९० रूपयांचा मुद्देमाल माल जप्त करण्यात आला असल्याची पण माहीती मिळाली.
   या दरम्यान नमुद गुन्हातील आरोपीला पुढील तपासा करीता पोलिस स्टेशन घुग्घुस यांचा ताब्यात देऊन पुढील तपास घुग्घुस पोलिस करीत असल्याची पण माहीती दिली.
 सदरील कारवाई पोलिस अधीक्षक मुक्काम सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू चंद्रपूर यांचा मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर चे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार,  यांचा नेतृत्वात  साहय्यक पोलिस निरीक्षक महेश कांक्रेडवार, साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संपोष निंभोरकर, चेतन गज्जलवार, जयंता चुनारकर, नितेश महात्मे, अमोल सावे, प्रफुल गारघाटे, किशोर वाकाटे, महिला अंमलदार अपर्णा मानकर, दिपिका सोडणार, वाहन चालक दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरसह सायबर पोलिस स्टेशन चंद्रपूर यांनी कारवाई केली.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular