Tuesday, June 23, 2026
HomeUncategorizedसत्यशोधक न्युज

सत्यशोधक न्युज

मुख्य संपादक:- राजु एन. शंभरकर

मो.न- 9511673435

रस्ता सुरक्षा सप्ताह ; निमित्त जनजागृतीपर रॅली

 जिल्हा रस्ता सुरक्षा सप्ताह निमीत्य चंद्रपुर  ०१ जानेवारी २०२५ पासून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले असता पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर व नेहरू युवा केंद्र, चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतुक नियंमांचे महत्व व मोटार वाहन कायद्याविषयी नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी याकरीता सुद्दा २० जानेवारी ला शालेय विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांची वाहतुक नियमनाविषयी जनजागृत्ती रॅली आयोजीत करण्यात आली
   यावेळी जनजागृती रॅली चे आयोजन वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर बस स्टॉप सुरूवात तर परत वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर पर्यंत काढण्यात आली. सदर जनजागृत्ती रॅली मध्ये सरदार पटेल महाविद्यालय, राजीव गांधी कॉलेज व इतर शाळेचे विद्यार्थी संबंधित शाळेचे शिक्षक  वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपुर चे पोलीस निरीक्षक प्रविण कुमार पाटील, सहायक पोलीस निरिक्षक प्रविण सोनुने, वा. नि.शा. अॅड देवा पाचभाई व इतर नेहरू युवा केंद्राचे पदाधिकारी व वाहतुक पोलीस अंमलदार आवर्जून उपस्थित होते.
  या प्रसंगी जनजागृत्ती रॅली सप्ताह निमित्ताने वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular