Tuesday, August 11, 2026
HomeUncategorizedचंद्रपूर जिल्ह्य़ातील बांधकामगारांना पेटी व किचन सेट वाटप केंद्रावर सोयीसुविधा द्या.

चंद्रपूर जिल्ह्य़ातील बांधकामगारांना पेटी व किचन सेट वाटप केंद्रावर सोयीसुविधा द्या.

सुरेश मल्हारी पाईकराव
संस्थापक अध्यक्ष सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर

कार्यकारी संपादक : हंसराज एल रामटेके
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र

चंद्रपूर – आज दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय व सहाय्यक कामगार आयुक्त राज्य यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की
बांधकामगारांना पेटी व किचन सेट वाटप करण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार एम. आय. डी. सी. चंद्रपूर येथे वाटप केंद्र सुरू करण्यात आले असून. या सेंटरची / केंद्राची पुर्व सुचना बांधकामगारांना न देता सुरू करण्यात आली. त्यामुळे कामगारांना शासनाने दिलेल्या सुचनानुसार असे वाटत होते की पेटी व किचन सेट वाटप सुरू झाले. असे समजुन तिथे अहोरात्र बांधकामगार महिला व पुरुष बहुसंख्येने रांग लावुन बसलेले असत.त्यामुळे शासनाने ठरवुन दिलेल्या केंद्र स्थळावर चेंगराचेंगरी, धक्काबुक्की, शिवीगाळ, मारामारी असे प्रकार घडत असल्याने. शासनाने सदरील प्रकार थांबविण्याकरिता बांधकामगारांना योजनेचा लाभ घेण्याकरिता सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर सुचविलेल्या सुचना नुसार लाभार्थांना लाभ देण्यात यावा.

चंद्रपूरचा तापमान बघता उन्हात लहान लहान मुल घेऊन महिला रांगेत उभे राहतात.
उपाशापोटी महिला रांगेत असल्याने त्यांना चक्कर येणे व बल्लारपूर येथे झालेला अपघात अद्याप लोक विसरलेले नाही.
तरी शासनी खालील मागण्याची लवकरात लवकर पूर्तता करून पेटी व किचन सेट चे वाटप करण्यात यावे.
मागण्या खालील प्रमाणे

1) ज्या दिवशी शासन लाभार्थांना लाभ देणार आहात त्याचा आठ दिवस अगोदर लाभ मिळणार्‍या सदरील व्यक्तीस त्यांचा संपर्क नंबर वरती टोकण नंबर सहित मेसेज अथवा व्हॉटअप्प द्वारे कळविण्यात यावे. जणे करुन सदरील व्यक्ती शासनाने दिलेल्या तारखे नुसार वेळेवर उपस्थित राहिल. ज्यामुळे गर्दी न होता अनैतिक प्रकार घडणार नाही.

2) पेटी व किचन सेट वाटप केंद्र येथे बांधकामगार लाभार्थांच्या नावाची यादी जाहीर करुन त्यांचा टोकण नंबर, नावाप्रमाणे पेटी व किचन सेट वाटप करण्यात यावा.

3) बांधकामगार लाभार्थांना पेटी वाटप केंद्र ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची सोय करण्यात यावी.

4) बांधकामगार योजनेचा अंतर्गत येणाऱ्या लाभार्थांना या पुढेही महाराष्ट्र शासना कडुन मिळणारा लाभ पारदर्शकतेचा रिती नुसार देण्यात यावा. असे निवेदन सुरेश मल्हारी पाईकराव यांनी सादर केले

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular