Monday, June 22, 2026
HomeUncategorizedघरफोडी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना बेड्या

घरफोडी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना बेड्या

मुख्य संपादक : राजू एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न.9511673435.

 चंद्रपूर : चंद्रपूरसह राजुरा येथे घरफोडी, दुचाकी चोरी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना शहर पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. चोरट्यांकडून पाच लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. व्यंकटेश उर्फ वक्या महेंद्र कोपोलवार (२२) रा. आनंदनगर महाकाली कॉलरी चंद्रपूर, स्नेहा उर्फ भारती उर्फ मुस्कान सरेश खैरे (२९) रा. भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर, तन्वीर कदीर बेग (२४) रा. भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर, महोम्मद फौजान महोम्मद वकील अन्सारी (४०) रा. भारखेडा नागपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. चोरट्यांनी सात ठिकाणी चोरी

केल्याची कबुली दिली.
१४ एप्रिल रोजी सायंकाळी बाबुपेठ येथील किरण कांबळे हे घराला कुलूप लावून आंबेडकर जयंतीमध्ये गेले असता, त्याचे कुलूपबंद घर फोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार शहर पोलिसांत दिली. शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पीएसआय संदीप बच्छीरे यांच्या नेतृत्वातील चमूंनी लगेच त्याच्या घराचा पंचनामा करुन संशयित व रेकार्डवरील चोरटा व्यंकटेश कोपोलवार याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने काही साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. तसेच नागपूरला दागिणे विकल्याची माहीती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular