Monday, June 22, 2026
HomeUncategorizedछत्रपती क्रिडा मंडळाचा प्रविण ला सिल्वर पदक

छत्रपती क्रिडा मंडळाचा प्रविण ला सिल्वर पदक

मुख्य संपादक : राजू एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न.9511673435

हिमालय प्रदेश येथील शिमला येथे नुकत्याच पार पडलेल्या ४६ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा स्पर्धा २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा राज्य कबड्डी संघातील महावितरण कंपनी हिंगणघाट चे महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ राष्ट्रीय खेडाळू प्रविण वासाडे यांचा संघाने सिल्वर पदक पटकावले आहे.
प्रविन वासाडे महावितरणच्या हिंगणघाट विभागात वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वीही कबड्डी अनेक पदके पटकावली आहे. यावर्षी अखिल भारतीय विद्युत क्रीडा स्पर्धा शिमला (हिमालय प्रदेश) येथे २७ ते २९ एप्रिल भरविण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत वासाडे यांची आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जात शिमला संघा सोबत अंतिम लढत झाली. अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत वासाडे यांनी सिल्वर पदकावर आपले व राज्याचा कबड्डी खेळाडूंचे नाव कोरले.
त्यांच्या या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष अफजल भाई, सहसचिव शंकर बोरघरे, कोषाध्यक्ष जितेंद्र माहुरे, सदस्य शाम चटपल्लीवार, मंडळाचे जेष्ठ नामवंत खेळाडू सुरज पाशी, सागर मोरे, राष्ट्रीय खेळाडू धीरज पाशी, खेडाळू अजय पाडवार क्रीडा प्रेमी आदिंनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular