Monday, June 22, 2026
HomeUncategorizedमहाराष्ट्र दिन – मराठी भाषेच्या, संस्कृतीच्या आणि अस्मितेच्या जाज्वल्य प्रेरणेचा दिवस –...

महाराष्ट्र दिन – मराठी भाषेच्या, संस्कृतीच्या आणि अस्मितेच्या जाज्वल्य प्रेरणेचा दिवस – आ. किशोर जोरगेवार

*आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते तहसील कार्यालयात ध्वजारोहण

मुख्य संपादक : राजू एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न.9511673435

1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रपूर तहसील कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार राजू धांडे, जितेंद्र गादेवार, वडसकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, 1 मे 1960 रोजी भाषावार प्रांतरचनेनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ही केवळ राज्यनिर्मिती नव्हे, तर मराठी अस्मितेचा, संस्कृतीचा आणि आत्मसन्मानाचा गौरवशाली क्षण होता. या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, महात्मा फुले यांचा सामाजिक विचार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानदर्शन आणि कर्मयोगी लोकमान्य टिळकांचा लढवय्या वारसा आहे.
आज महाराष्ट्राने विज्ञान, उद्योग, शिक्षण, कला, क्रीडा, शेतकरी चळवळ अशा अनेक क्षेत्रांत आपली छाप उमटवली आहे. सामान्य नागरिक, कामगार, शेतकरी, महिला बचतगट, तरुण उद्योजक यांचे कष्ट, जिद्द आणि आत्मबल हाच या राज्याच्या प्रगतीचा पाया आहे. महाराष्ट्र दिन हा मराठी भाषेच्या, संस्कृतीच्या आणि अस्मितेच्या जाज्वल्य प्रेरणेचा दिवस आहे. असे आमदार जोरगेवार म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र हे औद्योगिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. मात्र अजूनही ग्रामीण भाग, आदिवासी पट्टे, कामगार व शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्याचा मोठा प्रवास आपल्यासमोर आहे. आपल्या जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत अधिक प्रभावी काम व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपला महाराष्ट्र अधिक बळकट, समतावादी आणि न्यायप्रिय व्हावा, यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने कार्य करणे आवश्यक असल्याचे ते यावेळी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular