Monday, June 22, 2026
HomeUncategorized*समाजाच्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे – चंद्रपूरमध्ये भव्य रोग निदान शिबिर संपन्न

*समाजाच्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे – चंद्रपूरमध्ये भव्य रोग निदान शिबिर संपन्न

*आरोग्य हेच खरे धन
*डॉ. मंगेश गुलवाडे* यांचे मार्गदर्शनाखाली बहुवैद्यकीय तपासण्या व औषधी वितरण
मुख्य संपादक : राजू एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो .न.9511673435

महाराष्ट्र
चंद्रपूर

दिनांक 18 मे 2025 रोजी इंडियन रेड क्रॉस सोसायटी, संत आंद्रेया चर्च आणि टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आणि रुग्णांना मोफत औषधे वितरित करण्यात आली.

शिबिरात खालील तपासण्या करण्यात आल्या:

  1. हृदय, कान-नाक-घसा, व त्वचाविकारांची तपासणी
  2. रक्त तपासणी, थायरॉईड, हिमोग्लोबिन, सिकल सेल, लिव्हर व किडनी लॅबोरेटरी तपासण्या
  3. स्त्रियांचे मासिक पाळी संबंधित आजार, तोंडाचे आजार, स्तनातील गाठी व कॅन्सर तपासणी
  4. मोफत औषधी वितरण

डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर अत्यंत यशस्वीपणे पार पडले. त्यांनी समाजात आरोग्य जनजागृतीचा संदेश दिला आणि प्रत्येक व्यक्तीने नियमित आरोग्य तपासणी करून रोग टाळावेत, असे आवाहन केले. सदर शिबिरात
डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. राजीव देवइकर, डॉ. सत्यनारायण दुधीवार , डॉ. बाल मुकुंद पालीवाल, डॉ. प्रियंका पालीवाल, डॉ. प्रदीप वरघणे, डॉ. आशिष बारब्दे, डॉ. ट्विंकल ढेंगळे, डॉ. पीयूष मेश्राम, डॉ. गार्गी (GMC), डॉ. दिक्षा (GMC), डॉ. अभिजीत (GMC) इत्यादी डॉक्टर्स आपले योगदान दिले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरिता
काजल विश्वास, नताशा देवघरे, वैष्णवी सहारे सुभाष मुरस्कर आरिफ शेख विनोद पातुर्डे यांनी अथक परिश्रम घेतले.

शिबिराद्वारे अनेक गरजू रुग्णांना वेळेत निदान व उपचार मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अशा प्रकारची आरोग्य शिबिरे ही समाजाच्या हितासाठी उपयुक्त असून भविष्यातही अशी उपक्रमांची पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular