Monday, June 22, 2026
HomeUncategorizedआमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून ११ बालके शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना..

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून ११ बालके शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना..

*आरोग्य शिबिरातील रुग्णांवर ४० लाख रुपयांच्या शस्त्रक्रिया होणार निशुल्क; रुग्णांना मोठा दिलासा

संपादक : राजेंद्र आर तराले
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो.न.9404862389

जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून मोठा दिलासा देणारी मोहीम राबवण्यात आली आहे. ज्युपिटर हॉस्पिटल, मुंबई आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तपासण्यात आलेल्या बालकांपैकी ११ बालकांना पहिल्या टप्प्यात पुढील उपचारासाठी आज मुंबईला रेल्वेने रवाना करण्यात आले. तेथे त्यांच्यावर हृदयविकारावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शस्त्रक्रियांसाठी एका रुग्णावर अंदाजे २ ते ४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या ११ रुग्णांवर साधारणतः ४० लाख रुपयांच्या शस्त्रक्रिया होणार आहेत. हा संपूर्ण खर्च आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून करण्यात आला आहे. याशिवाय, रुग्ण बालकासह त्यांच्या दोन नातलगांच्या मुंबईतील राहण्याची व प्रवासाची संपूर्ण व्यवस्था आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदारांच्या सामाजिक भानाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.विनोद बुरांडे, प्रविण वाभितकर, रिया सराटे, प्रांजली जिवतोडे, रोहिनी मोहुर्ले, यश वय्यातकर, प्रविन वासेकर, प्रज्ञा नागोसे, नीलिमा शेंडे, रिद्धी बत्तुलवार अशी पाठविण्यात आलेल्या रुग्णांची नावे आहेत.
आज सकाळी ९.३० वाजता या बालकांना त्यांच्या पालकांसह मुंबईकडे रेल्वेने रवाना करण्यात आले. आमदारांच्या पुढाकारामुळे कोणतीही आर्थिक अडचण न येता मोफत उपचार मिळणार असल्याने रुग्णांचे नातेवाईक भारावून गेले आहेत. आमच्या घरात अशा महागड्या उपचारांची सोय शक्यच नव्हती. आमदार किशोर जोरगेवार यांनी आमच्यावर मायेची सावली धरली, असे भावुक उद्गार बालकांच्या आई-वडिलांनी व्यक्त केले आहेत.
समाजातील गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. आरोग्य शिबिरात पात्र झालेले रुग्ण गंभीर आजारांशी झुंज देत आहेत. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठीच आमच्या पुढाकारातून या शस्त्रक्रियांचा संपूर्ण खर्च उचलण्यात आला आहे. या बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात आपण यशस्वी होत आहोत. त्यांच्या उत्तम उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना केवळ उपचारच मिळत नाहीत, तर त्यांच्या जीवनात नव्या आशा निर्माण होत आहेत. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यातून मुंबईसारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेची संधी मिळणे ही निशुल्क आरोग्यसेवा उपक्रमाची मोठी देणगी ठरली आहे. तर पुढील टप्यात आणखी रुग्णांना उपचाराकरीता मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular