मुख्य संपादक -राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्युज महाराष्ट्र
मो.न.9511673435
शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेंतर्गत दिनांक २३ जून २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली अंतर्गत उपकेंद्र चुनाळा यांच्या वतीने ग्रामपंचायत बामनवाडा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे व वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहलता बढे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भारती पाल उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी गावातील प्रत्येक नागरिकाने नियमित आरोग्य तपासणी करून आपले गाव आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सिल्व्हिया अलेक्झांडर यांनी नागरिकांना क्षयरोग, कुष्ठरोग, सिकल सेल, पल्स पोलिओ, किटकजन्य व जलजन्य आजारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विविध आजारांपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.
या शिबिरात ९७ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तपासणीदरम्यान ५८ नागरिकांची रक्तदाब तपासणी, ५८ नागरिकांची मधुमेह तपासणी, ७ मलेरिया तपासण्या व ३ कुष्ठरोग तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय ४९ आयुष्मान कार्ड, ६७ आभा कार्ड व २ वयोवंदन कार्ड तयार करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य सहाय्यक देवराव जाधव, आरोग्य सेवक संतोष कुकडे, आरोग्य सेवक अरुण नागरे, आरोग्य सेवक प्रदीप बनसोड, आरोग्य सेविका वैशाली कोडांवार, डेटा एन्ट्री ऑपरेटर पंकज करमनकर, आशा कार्यकर्त्या वाघमारे, चौधरी, धुर्वे, मारपेली व सुनिता निमकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
याशिवाय गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे आरोग्य शिबिर यशस्वी ठरले असून ग्रामीण भागात आरोग्य जनजागृतीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



