Friday, August 7, 2026
HomeUncategorized*"दोन थेंब प्रत्येक वेळी – पोलिओवर विजय दरवेळी.

*”दोन थेंब प्रत्येक वेळी – पोलिओवर विजय दरवेळी.

*इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे पल्स पोलिओ जनजागृती व लसीकरण विशेष उपक्रमास प्रारंभ .

संपादक -राजेन्द्र आर तराले

सत्यशोधक न्युज महाराष्ट्र
मो.न.9764863889.

चंद्रपूर |

“दोन थेंब प्रत्येक वेळी – पोलिओवर विजय दरवेळी” या घोषवाक्याला साकार करत इंडियन रेड क्रॉस सोसायटी, चंद्रपूर यांच्या वतीने 28 जून ते 5 जुलै 2026 या कालावधीत पल्स पोलिओ 2026 विशेष जनजागृती व लसीकरण उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ दि. 28 जून 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की, “पोलिओचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक पालकाने या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्त्वाची आहे.”

या कार्यक्रमास डॉ बी एच दाभेरे
डॉ. सुशील मुंदडा, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. मन्सूर चिनी, सीए शादाब चिली, डॉ. संजय घाटे, डॉक्टर आशिष बारबदे अश्विनी खोब्रागडे आणि श्री. प्रशांत हजबन यांची विशेष उपस्थिती लाभली.

या विशेष उपक्रमांतर्गत 28 जून ते 5 जुलै 2026 या कालावधीत विविध भागांत जनजागृती, पालक प्रबोधन, पोलिओ लसीकरणाबाबत मार्गदर्शन तसेच शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

इंडियन रेड क्रॉस सोसायटीने सर्व पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत आणि पोलिओमुक्त भारताच्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष मुरस्कर आरिफ खान आशिष गिरडकर रोहित चौबे तथा इंडियन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले


RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular