Wednesday, August 5, 2026
HomeUncategorizedलोक जनशक्ती पार्टी (रामविलास)चा चंद्रपूर जिल्ह्यात झपाट्याने विस्तार; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)चा चंद्रपूर जिल्ह्यात झपाट्याने विस्तार; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश

सत्यशोधक न्यूजमुख्य संपादक : राजु एन. शंभरकरमो. 95 11 67 34 35

चंद्रपूर : लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चंद्रपूर जिल्ह्यात आपले संघटन झपाट्याने मजबूत करत असून, पक्षाच्या विस्ताराला मोठी गती मिळत आहे. दिनांक २ ऑगस्ट (रविवार) रोजी आयोजित कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली.

कार्यक्रमात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्षाची आगामी वाटचाल, संघटन विस्तार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची रणनीती याबाबत मार्गदर्शन केले. चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाचे मजबूत संघटन उभे करण्यासाठी गावागावांत संपर्क मोहीम राबविण्यात येणार असून, युवक, महिला आणि सामाजिक क्षेत्रातील नव्या चेहऱ्यांना पक्षात संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह, आत्मविश्वास आणि पक्षाच्या वाढत्या जनाधाराचे चित्र कार्यक्रमातून पाहायला मिळाले.

पक्षाच्या माहितीनुसार, येत्या सप्टेंबर महिन्यात विविध राजकीय पक्षांतील हजारो कार्यकर्त्यांचा लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)मध्ये प्रवेश होणार असून त्यासाठी जिल्हाभरात तयारी सुरू आहे. विशेषतः युवा, महिला आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने पक्षाचे संघटन अधिक बळकट होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला पूर्व विदर्भ प्रभारी अॅड. वामशीकृष्णा आरिकिल्ला, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ ठेंगणे, निलेशभाऊ हिवराळे, राहुल वानखेडे, दिनेश हिंगले, सुमित ढोले, विश्वास तकला यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाचा वाढता विस्तार लक्षात घेता, येत्या काळात आणखी भव्य मेळावे, संघटन विस्तार अभियान आणि मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सोहळ्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular