Saturday, August 8, 2026
HomeUncategorizedनिस्वार्थ समाजसेवा हेच जीवनाचे ध्येय; गडचिरोलीच्या विकासात स्थानिक युवकांनाही संधी मिळावी" विलास...

निस्वार्थ समाजसेवा हेच जीवनाचे ध्येय; गडचिरोलीच्या विकासात स्थानिक युवकांनाही संधी मिळावी” विलास बल्मवार .

रिपोर्टर -नामदेव धर्मा डोंगरे
सत्यशोधक न्युज महाराष्ट्र.

गडचिरोली प्रतिनिधी :-भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विलास बल्मवार यांनी समाजसेवा हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याचे सांगत, गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असल्याची माहिती दिली.
ते स्वतःच्या खर्चातून दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करतात. कोणत्याही प्रसिद्धीची किंवा वैयक्तिक स्वार्थाची अपेक्षा न ठेवता केवळ समाजहित आणि मानवसेवेच्या भावनेतून कार्य करणे, हीच आपल्या जीवनाची खरी दिशा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नक्षलग्रस्त भागात शांतता, विकास आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नक्षलवाद कमी होण्यास मोठी मदत झाल्याचे मतही बल्मवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे गडचिरोलीसह परिसरात विकासाला गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात मुळे औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळत असून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, या विकासाचा सर्वाधिक लाभ स्थानिक युवकांना मिळणे आवश्यक असल्याचे सांगत कंपनीने भरती प्रक्रियेत स्थानिक पात्र युवकांना प्राधान्याने रोजगार द्यावा, अशी त्यांनी ठाम मागणी केली.
“औद्योगिक विकास तेव्हाच यशस्वी ठरेल, जेव्हा त्या भागातील स्थानिक युवकांच्या हाताला काम मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनमानात सुधारणा होईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळणे हीच काळाची गरज आहे,” असे मत विलास बल्मवार यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular