Saturday, September 26, 2026
HomeUncategorizedमहिंद्रा ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिक प्रशिक्षणामुळे युवकांना रोजगाराची नवी दिशा : जिल्हाधिकारी अविश्यांत...

महिंद्रा ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिक प्रशिक्षणामुळे युवकांना रोजगाराची नवी दिशा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा.

तिसऱ्या बॅचचा समारोप; १७ प्रशिक्षणार्थ्यांना महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत नियुक्तीपत्रांचे वितरण.

सत्यशोधक न्यूज
मुख्य संपादक
राजु एन शंभरकर
95 11 67 34 35

गडचिरोली, दि.27

कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे. उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास रोजगाराच्या संधी अधिक व्यापक होतात. प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने प्रामाणिकपणा, शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर आपल्या कौशल्यात सातत्याने भर घालत उज्ज्वल भविष्य घडवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “महिंद्रा ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिक तिसरी बॅच समारोप व नियुक्तीपत्र वितरण (प्लेसमेंट ड्राईव्ह) सोहळा” जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीने प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगाभिमुख आणि दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्यामध्ये आवश्यक तांत्रिक कौशल्यांचा प्रभावी विकास झाला आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या उत्तम संधी प्राप्त होत असून कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वय अधिक बळकट होत आहे.

त�

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular