Friday, September 25, 2026
HomeUncategorizedजांबिया शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना बेड उपलब्ध; वृत्तातील दाव्यांबाबत प्रशासनाचा खुलासा

जांबिया शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना बेड उपलब्ध; वृत्तातील दाव्यांबाबत प्रशासनाचा खुलासा

शाळेत १७७ विद्यार्थी निवासी; पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांटची सुविधा

मुख्यसंपादक – राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज
मोबाईल 95 11 67 34 35

गडचिरोली, दि. १४ (जिमाका) : भामरागड तालुक्यातील जांबिया येथील शासकीय आश्रमशाळेबाबत दि. १४ ऑगस्ट रोजी एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. सदर शाळेत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक बेड उपलब्ध असून, शाळेतील पायाभूत सुविधांबाबत वृत्तात नमूद काही बाबी वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

जांबिया येथील शासकीय आश्रमशाळा नवीन इमारतीत कार्यरत असून नवीन स्वतंत्र वसतिगृह इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सध्या मुलांचे वसतिगृह शाळेच्या इमारतीत कार्यरत आहे, तर मुलींचे वसतिगृह नवीन इमारतीत सुरू असल्याचे खुलाशात नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये शाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत ८३ मुले आणि ९४ मुली असे एकूण १७७ विद्यार्थी निवासी आहेत. विद्यार्थ्यांसाठी ९० बंक बेड उपलब्ध असून त्यांची क्षमता १८० विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे निवासी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत पुरेशी बेड व्यवस्था उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रेही प्रशासनाने सादर केली आहे.

शाळेच्या जुन्या इमारतीमध्ये १०० खाटांची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर आवश्यकतेनुसार बंक बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे जुन्या मागणीच्या पत्राचा संदर्भ सध्याच्या परिस्थितीशी जोडणे योग्य नसल्याचे खुलाशात स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी २ आरओ वॉटर प्युरिफायर बसविण्यात आले असून ते कार्यरत आहेत. शाळेतील अधीक्षकाचे पद रिक्त असल्याने संबंधित जबाबदारी शिक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच स्त्री अधीक्षक पदासाठी स्वतंत्र अर्ज मागविण्यात आले असून पात्र उमेदवाराची निवड झाल्यानंतर नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular