मुख्यसंपादक -राजु एन शंभरकर
सत्यशोधक न्यूज
मोबाईल 95 11 67 34 35
चंद्रपूर : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शरणमं बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
संस्थेचे अध्यक्ष शेखर तावाडे यांनी यावेळी सांगितले की, “विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून राष्ट्राच्या विकासाचा मजबूत पाया आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या शिक्षणाची संधी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये यासाठी शरणमं बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे.”
संस्थेच्या वतीने भविष्यातही विद्यार्थी, शिक्षण आणि समाजहितासाठी असेच उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



