Thursday, September 24, 2026
HomeUncategorizedचंद्रपूरच्या अधीरने देशात पटकावला पाचवा क्रमांक; श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

चंद्रपूरच्या अधीरने देशात पटकावला पाचवा क्रमांक; श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

अवघ्या ४.९ वर्षांच्या अधीर अमृता सुबोध जुन्नावारची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी..

मुख्यासंपादक :राजु एन. शंभरकर
सत्यशोधक न्यूज महाराष्ट्र
मोबाईल. 95 11 67 34 35.

चंद्रपूरचा अवघ्या ४.९ वर्षांचा अधीर अमृता सुबोध जुन्नावार याने स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत Under-6 Age Group मध्ये देशात पाचवा क्रमांक पटकावला आहे. दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी पणजी, गोवा येथे आयोजित RRSFI राष्ट्रीय स्तरावरील स्केटिंग स्पर्धेत अधीरने उत्कृष्ट कामगिरी करत हे यश संपादन केले.

राष्ट्रीय स्तरावरील या दमदार कामगिरीच्या जोरावर अधीरची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अवघ्या ४.९ वर्षांच्या वयात राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवत अधीरने चंद्रपूरचे नाव देशाच्या स्केटिंग क्षेत्रात उज्ज्वल केले आहे.

विशेष म्हणजे, हे अधीरचे स्केटिंग क्षेत्रातील पहिलेच यश नसून, यापूर्वीही त्याने विविध जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पदके व पुरस्कार मिळवले आहेत. अत्यंत कमी वयात स्पर्धात्मक स्केटिंगमध्ये सातत्याने उत्तम कामगिरी करत अधीरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या प्रत्येक स्पर्धेतील कामगिरीत सातत्याने सुधारणा होत असून, राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे पाचवे स्थान त्याच्या मेहनतीला मिळालेली मोठी दाद मानली जात आहे.

अधीरने अत्यंत कमी वयात मिळवलेले हे यश सातत्यपूर्ण सराव, जिद्द, मेहनत आणि क्रीडा क्षेत्रातील समर्पणाचे फलित आहे. त्याच्या या कामगिरीमुळे चंद्रपूरच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, कुटुंबीय, क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार तसेच चंद्रपूरकरांकडून अधीरवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अधीरच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक विनोद निखाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली अधीरने प्रशिक्षण घेत राष्ट्रीय स्तरावर ही उल्लेखनीय झेप घेतली आहे. अधीरच्या प्रतिभेला योग्य दिशा देत त्याच्या सरावावर आणि तंत्रावर प्रशिक्षक विनोद निखाडे सातत्याने मेहनत घेत आहेत.

आता श्रीलंकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अधीर सज्ज झाला असून, या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही तो आपल्या कामगिरीने चंद्रपूर आणि भारताचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular